ETV Bharat / state

रखडलेल्या भरती प्रक्रियेसाठी कराळे मास्तरांच्या नेतृत्वात आंदोलन, वऱ्हाडी घोषवाक्यांनी वेधले लक्ष्य - MPSC Recruitment Process

वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पर्धा परीक्षा रखडल्याने विद्यार्थ्यानी आंदोलन केले. यावेळी त्यांनी केलेल्या घोषवाक्यांनी लक्ष्य वेधून घेतले होते. डिग्री विकणे आहे, तुमचे पोट्टे मंत्री जंत्री... आम्ही वाजवू का फक्त घंटी, मले विकत घेता का हो कोणी, खालती डोके वरती पाय... आता आम्ही करायचं काय, फक्त भेटा २०२४ ला दाखवतो इंगा अशा घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन येथे आंदोलन करण्यात आले.

agitation for the stalled mpsc recruitment process in wardha
आंदोलन रखडलेल्या एमपीएससी भरती प्रक्रियेसाठी
author img

By

Published : Jul 15, 2021, 7:34 AM IST

वर्धा - राज्यात कोरोनाच्या संकटाने मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. यामुळे जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचा दावा वऱ्हाडी भाषेतून शिकवणारे नितेश कराळे गुरुजींनी केला आहे. याच मागणीसाठी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या वऱ्हाडी भाषेतील घोषवाक्यांनी लक्षवेधून घेतले.

आंदोलन रखडलेल्या एमपीएससी भरती प्रक्रियेसाठी

घोषवाक्यांनी वेधले लक्ष्य -

यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी डिग्री विकणे आहे, तुमचे पोट्टे मंत्री जंत्री... आम्ही वाजवू का फक्त घंटी, मले विकत घेता का हो कोणी, खालती डोके वरती पाय... आता आम्ही करायचं काय, फक्त भेटा २०२४ ला दाखवतो इंगा अशा घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन केलेल्या आंदोलनाने लक्ष्य वेधून घेतले होते. अस्सल ग्रामीण आणि वऱ्हाडी भाषेतून सामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी एमपीएसीचे स्वप्न उराशी बाळगून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहे. पण सरकारच्या आडमुठे धोरणाने ते पुरते मेटाकुटीला आल्याने हीच परिस्थिती या घोषणांच्या फलकातून त्यांनी मांडली होती.

agitation for the stalled mpsc recruitment process in wardha
आंदोलन रखडलेल्या एमपीएससी भरती प्रक्रियेसाठी

स्वप्निलची आत्महत्या भरती प्रक्रिया रखडल्यामुळे -

कोरोनाचे कारण देत 2 वर्षांपासून रखडलेल्या MPSC च्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया रखडल्याने राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे स्वप्निल लोणकर आत्महत्या केली. या आत्महत्येला राज्य शासनच जबाबदार असल्याच्या आरोप यावेळी कराळे यांनी केला. यात कधी कोविड तर कधी मराठा आरक्षण, अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत.

या आहेत मागण्या -

एमपीएसी (MPSC 2021)चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे. युपीएसीच्या (UPSC) धर्तीवर नियमित पद्धतीने एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात. एमपीएससी कंबाईनची तारीख जाहीर करावी. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्या 6 असायला पाहिजे परंतु मागील 3 वर्षांपासून दोनच सदस्य याचा डोलारा सांभाळत आहेत. येत्या 10 दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा. एमपीएससी आणि महाआईटीच्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकरात लवकर घेऊन अंतिम निकाल लावावा. स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या 3600 आणि व पीएसआयची चाचणी 4500 मुलाखती लवकरात लवकर घेण्यात याव्यात. रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी. राज्य सरकारच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व परीक्षा खासगी कंपनीकडून न घेता, एमपीएससी मार्फतच घ्याव्यात, तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्णवेळ नोकऱ्या द्याव्यात. मागील 3 वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही. येत्या 10 दिवसांत महापरीक्षा पोर्टलवर भरून घेतलेल्या अर्जां बाबत महाविकास आघाडी सरकारनेजाहीर केलेल्या 12,538 जागा बाबत अधिसूचना जारी कराव्या यासह अन्य मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.