वर्धा - विनापरवानगी गौण खनिज उत्खनन प्रकरणी अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 238 कोटी 99 लाख 72 हजार 148 रुपये दंड आकारण्यात आला आहे. हीच कंपनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची कंत्राटदार कंपनी आहे.
अॅफकॉन कंपनीने धानोली (मेघे) कॅम्पअंतर्गत केळझर, खापरी शिवारात गौण खनिजाचे उत्खनन केले होते. त्याबाबत एम.एस. कोझी प्रॉपर्टीज लिमिटेडने तक्रार केली होती. त्यानंतर इटीएस मोजमाप केले असता 3 लाख 2 हजार 528 ब्रास गौण खनिज अॅफकान आणि सहकंत्राटदारांनी विनापरवानागी उत्खनन केल्याचे आढळले. त्यावरून सेलू तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अॅफकॉन कंपनीवर २३८ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच दंडाची रक्कम येत्या ३० जानेवारीपर्यंत खजिन्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.