वर्धा - आर्वी तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्याला पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. यावेळी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. दीपेश हिम्मत गोरडे (वय 26 वर्षे), असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
मार्च महिन्याच्या 11 तारखेला आर्वी शहरातील एका भागात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले हे करत होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागली आणि तपास रखडला.
मात्र, तीन महिने उलटल्यानंतर दीपेश हा नागपुरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक ढोले हे पथकासह जावून दीपेश व त्या मुलीला ताब्यात घेतले. पीडित मुलीचे वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी दीपेशवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली व पीडितेला तिच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले.
पुढील तपास सुरू असून या प्रकरणात पोलीस कोठडी मिळवत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलीस कर्मचारी विशाल मडावी, गणेश भोमले, सतीश नंदागवळी अतुल भोयर हे करत आहे.
हेही वाचा - अहो तुम्हीच सांगा पैसे आणायचे तरी कुठून....! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मुंडन आंदोलन