ETV Bharat / state

धक्कादायक! वर्ध्याच्या कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या - वर्धा कारागृह बातमी

हत्येच्या गुन्ह्यात वर्धा कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगताना राहत असलेल्या बराकीतील खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेत या कैद्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

वर्ध्याच्या कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या

author img

By

Published : Aug 6, 2020, 3:09 PM IST

वर्धा - कारागृहात कैद्याचे जीवन जगण्याच्या नैराश्यातून एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपीच्या मृत्यूच्या घटनेने कारागृहातील सकाळ धक्कादायक झाली. आजन्म कारावासाची शिक्षा भोगताना राहत असलेल्या बराकीतील खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेत या कैद्याने आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील गोपीचंद रामचंद्र डहाके (वय 38) असे मृतक कैद्याचे नाव आहे.

गोपीचंद हा वर्धा जिल्ह्यातील कारागृहात मागील दोन वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनतर अमरावती येथून वर्ध्याच्या कारागृहात त्याला आणण्यात आले. त्याला खूनाचा गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील विडुरचा रहिवासी होता. त्याला संचित रजेवर सोडण्यात आले. पण त्याचा संचित रजेचा कालावधी संपूनसुद्धा तो कारागृहात परतला नव्हता. यामुळे त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली होती. तर, पुढील काळात संचित रजा नियमानुसार अटींचे पालन न केल्याने मिळणार नव्हती. यामुळे तो नैराश्यात होता. मागील काही दिवसांपासून तो नैराश्यात राहत असल्याचेसुद्धा पुढे आले आहे.

दोन वेळा तो राहिला फरार

वर्धा कारागृहात आणण्यात आलेल्या आजन्म कारावसाचा कैदी गोपीचंद डहाके संचित रजेचा कालावधी संपला असताना परत आला नाही. यापूर्वी त्याला पहिल्यांदा 28 दिवसाची संचित रजा असतांना तो परत न येता 170 दिवस म्हणजे सहा महिने फरार राहिला. त्यावेळी सुद्धा त्याला ताब्यात घेण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा सुद्धा 28 दिवसांची संचित रजा असतांना तो परत आला नाही. यामुळे 407 दिवसांनी त्याला कारागृहात आणण्यात आले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक सुहास पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. यामुळे आता तिसऱ्यांदा संचित रजा मिळणार नाही हे स्पष्ट असल्याने तो नैराश्यात असल्याची चर्चा होती.

या प्रकरणात मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवण्यात आला आहे. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची प्राथमिक नोंद केली आहे. यात शवविच्छेदनाच्या अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.