वर्धा - जिल्ह्यातील आर्वीमध्ये घरातील स्नानगृहाचे बांधकाम सुरू असाताना एक-दोन नव्हे तर तब्बल 98 साप आढळून आले आहेत. शहरातील पांडुरंग वार्डात एका घरातील स्नानगृहाचे बांधकाम सुरू होते, यावेळी पाण्याच्या ड्रमखाली हे साप आढळून आले. हे साप पानदिवड प्रजातीतील असून ते बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
पानदिवड प्रजातीतील साप
घरात एवढ्या मोठ्या संख्येने साप आढळून आल्याने, एकच खळबळ उडाली. घरमालक मनोज कुडमुथे यांनी याची माहिती गरुडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेच्या गौतम पोहणे यांना दिली. माहिती मिळताच गरुडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाण्याच्या दोन ड्रमखालून पानदिवड प्रजातीतील तब्बल 98 साप पकडले व त्यांना एका बाटलीत बंद करण्यात आले. त्यानंतर या सापांची वनविभागात नोंद करून, त्यांना लहादेवी जलाशय वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले.
हेही वाचा - बार्ज पी-305 दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला 70 वर