वर्धा - आष्टी तालुक्यातील तळेगाव (शामजी पंत) शिक्षक कॉलनीत 7 वर्षीय चिमुकलीला चॉकलेट आणि आईस्क्रीमचे आमिष दाखवत अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. परंतु लक्ष्मीने स्वतःची सुटका करून घेतल्याने तीच कौतुक होत आहे. 9 मे रोजी ही घटना घडली असून सीसीटीव्हीत महिलाने चेहरा बांधून असल्याचे दिसत असल्याने 11 मे रोजी तळेगांव पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.
तळेगाव येथील शिक्षक कॉलनीत 7 वर्षीय लक्ष्मी करोले आपल्या अंगणात खेळत होती. पाळीव श्वान दिसत नसल्याने ती त्याला शोधत असतांना एक लाल ड्रेस घालून 20 ते 22 वर्षांची युवती आली. तिने लक्ष्मीला समोरच्या घरी कोण राहते, असे प्रश्न विचारले. त्यानंतर गजानन महाराजांचे मंदिर कुठे आहे, मला दाखवव असे म्हणत तिला घेऊन गेली. पण तेवढ्यात त्या युवतीने कोणाला तरी फोन लावून बोलत होती. लक्ष्मीला मात्र घरी जाण्याचा आग्रह धरला. पण त्या युवतीने चॉकलेट आणि आइसक्रीमचे आमिष दिले. समय सुचकता ठेवून चिमुकलीने त्या अज्ञात युवतीच्या हाताला झटका देण्याचा प्रयत्न केला. मात्र हात सोडला नाही. दोन प्रयत्ननानंतर लक्ष्मी स्वतःला वाचवत घराच्या दिशेने धावत सुटली. त्यानंतर तिने सगळं काही आपल्या आई वडिलांना सांगितले.
हेही वाचा - Facebook Friend Raped Married Woman : 'फेसबुक फ्रेंड'चा विवाहित महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड