ETV Bharat / state

सोमैया कोविड सेंटरच्या कामाचा शुभारंभ पुढील आठवड्यात

author img

By

Published : Jun 5, 2021, 3:53 PM IST

चुनाभट्टी येथील सोमैया मैदानात म्हाडाकडून उभारण्यात येणाऱ्या 1200 बेड्सच्या कोविड सेंटरच्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. सोमवारी कोविड सेंटरच्या बांधकामाची निविदा अंतिम करत कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

सोमय्या कोविड सेंटरच्या कामाचा शुभारंभ पुढील आठवड्यात

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोविड सेंटर आणि बेड्सची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार चुनाभट्टी येथील सोमैया मैदानात म्हाडाकडून उभारण्यात येणाऱ्या 1200 बेड्सच्या कोविड सेंटरच्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. सोमवारी कोविड सेंटरच्या बांधकामाची निविदा अंतिम करत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

1700 चौ मीटर जागेवर बांधकाम
तीन-चार महिन्यानी देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून यात लहान मुलांना धोका असल्याचे म्हटले जात आहे. तिसरी लाट आली आणि यात रुग्ण संख्या वाढली तर बेड्स, ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईत 4 नवीन कोविड सेंटर उभारले जात आहेत. त्यानुसार सोमैया मैदानावरील कोविड सेंटरच्या उभारणीची जबाबदारी म्हाडावर टाकण्यात आली आहे. तर मालाडमध्ये एमएमआरडीए आणि कांजूरमार्ग येथे सिडको कोविड सेंटर उभारत आहे. म्हाडा 55 कोटी रुपये खर्च करत 1200 बेड्सचे कोविड सेंटर उभारणार आहे.

निविदेला प्रतिसाद
सोमैया येथील कोविड सेंटरसाठी म्हाडाने काही दिवसांपूर्वी निविदा मागवली होती. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर आता सोमवारी निविदा अंतिम करत कंत्राट दिले जाणार आहे. तर त्यानंतर चार-पाच दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान एमएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेल्या मालाडमधील कोविड सेंटरच्या कामाने वेग घेतला आहे. हे काम जून अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर जुलैमध्ये हे सेंटर पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.