ETV Bharat / state

ठाण्यात सॅनिटायझरच्या आडून गुटख्याची तस्करी; 38 लाखांचा माल जप्त - ठाणे गुटखा तस्करी

विशेष म्हणजे ही गुटखा वाहतूक आयुर्वेदिक सॅनिटायझर, श्वान शाम्पू अशा वस्तू असलेल्या बॉक्स मागे गोणी ठेवून करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे.

Seized gutkha
जप्त केलेला गुटखा
author img

By

Published : Jun 1, 2020, 8:47 PM IST

ठाणे- जिल्ह्यात आयुर्वेदिक सॅनिटायझर, श्वान शाम्पू यांच्या औषधाच्या नावाने कंटेनरमधून गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाला यश आले आहे. या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये 100 गोणी मधून 37 लाख 80 हजार किमतींचा सुधा प्लस हा प्रतिबंधित गुटखा आढळून आला आहे.

कारवाईत गुटख्यासह कंटेनर 15 लाखांचा कंटेनर असा एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल भिवंडीत जप्त करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन घोषित करणे आधीपासूनच कोरोनाचा प्रसार ज्या गोष्टींमधून होऊ शकतो, अशा तंबाखू सिगरेट व अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी व्यावसायिकांवर बंदी आणली. त्यानंतर ही बहुतांश ठिकाणी गुटखा सर्रासपणे चढ्या दराने विकला जात असल्याने अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्री हाणून पाडण्यासाठी कंबर कसली आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर कारवाई करीत 84 लाखांचा गुटखा जप्त केला.

वळ ग्रामपंचायत हद्दीतील कारवाई ताजी असतानाच अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांना राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील मुनीसुरत कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक कंटेनरमधून गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या वरून त्यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक आयुक्त भूषण मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी अरुण खडके, माणिक जाधव, शंकर राठोड, अरविंद कांडेलकर, एम एम सानप, संतोष सुरसिया या पथकाने कारवाई करत कंटेनरची (HR 55 AH 4756) तपासणी केली असता त्यामध्ये 100 गोणी मधून सुधा प्लस हा प्रतिबंधित गुटखा किंमत 37 लाख 80 हजार आढळून आला आहे. यासह कंटेनर किंमत 15 लाख असा एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती भारद्वाज यांनी दिली.

विशेष म्हणजे ही गुटखा वाहतूक आयुर्वेदिक सॅनिटायझर, श्वान शाम्पू अशा वस्तू असलेल्या बॉक्स मागे गोणी ठेवून करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. सदरचा माल साठवण करणाऱ्या विरोधात अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 भारतीय दंड संहिता कायद्यानुसार नारपोली पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.