मालेगाव ( नाशिक ) : मालेगाव येथील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे मोटार सायकलला कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले व गुरुवारी रात्री मिटले. शुक्रवारी सकाळी पुन्हा दोन गटांत पुन्हा बाचाबाची घटना घडली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी व आर.सी.टी.चे जवान तैनात केले असून, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता ( Tense Silence in The Area ) आहे. चार आरोपींना पोलिसांनी केली अटक केली आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल : मालेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना दि. १ शुक्रवारी रोजी सकाळी घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले आहेत, तर काही दुकानांवर दगड फेकून नुकसान केले आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस कर्मचारी रामचंद्र जोशी, भीमराव राठोड, संदीप आनेबोईनवाड, पप्पू चव्हाण आदी कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोउनि बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून २९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल : मालेगाव येथील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी सांगितले की, मालेगाव येथील सरपंच, नगर पाटीजवळ गाडी चालवताना किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटांनी गुरुवारी रात्री थेट अर्धापूर पोलीस स्टेशन गाठले. दोन्ही गटांच्या सहमतीने सदर प्रकरण शांत झाले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या एकासोबत पुन्हा बाजाबाची झाली व प्रकरण चिघळत गेले. जमलेल्या जमावाने परिसरातील मोटरसायकल आदी वाहने व दुकानांचे मोठे नुकसान केले.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांवरही दगडफेक केल्याने काही जण किरकोळ जखमी झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात चौख पोलीस बंदोबस्त करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक एल. व्ही. राख, पोउनी बळीराम राठोड, पोउनी. बाबुराव जाधव, म. तय्यब अब्बास, भीमराव राठोड, संतोष सूर्यवंशी, महेंद्र डांगे, कल्याण पांडे, सपोनी तुगावे, पोउनी केसगे, संदीप आनेबोईनवाड, गुरुदास आरेवार, राजेश घुन्नर, बोईनवाड, बालाजी तोरणे, अर्जुन राठोड, सतीश लहानकर, ईश्वर लांडगे, अनिल गायकवाड आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
अर्धापूर मालेगाव प्रकरणी एकूण ५५ जणांवर गुन्हा दाखल : प्रशांत तुकाराम कुंटे रा. मालेगाव यांच्या फिर्यादीवरून २६ व इतर १५ ते २० सर्व रा. देगाव कु. यांच्यावर कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३०७, ३२४, ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील करीत आहेत. व पोउनी बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून २९ व इतर जणांवर १४३, १४७, १४८, १४९, ३३६, ३२४, ३२३, ३०७, ३५३ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
- हेही वाचा : मालेगावात किरकोळ कारणातून एकावर गोळीबार