ETV Bharat / state

...म्हणून मुंबई विभागात दहावी- बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता - वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री

लॉकडाऊनच्या दोन दिवस अगोदर घेण्यात आलेला इतिहासाचा पेपर आणि त्याचे गठ्ठे अद्यापही शाळांमध्ये पडून आहेत.

Mumbai
मुंबई शिक्षण विभाग
author img

By

Published : Jun 12, 2020, 7:04 PM IST

मुंबई - कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीला बसला आहे. मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळात अद्यापही लाखो उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहावीच्या तब्बल १६ टक्के आणि बारावीचे २० टक्के पेपर अद्यापही तपासले गेले नसून ते मॉडरेटरकडेच असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगवे यांनी आज दिली. उत्तरपत्रिका तपासण्याच्या विलंबामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष सांगवे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली. मुंबई आणि उपनगरात तब्बल ६० टक्केहून अधिक मॉडरेटर राहतात. लॉकडाऊनच्या अडचणीमुळे आतापर्यंत मुंबई विभागात दहावीच्या ८४ टक्के, तर बारावीच्या ८० टक्के उत्तरपत्रिका या तपासून जमा झाल्या आहेत, तर मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम शिल्लक असून अनेकांकडून त्या उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम अर्धवट राहिले. त्यामुळे आम्ही १५ आणि १६ जून रोजी मुंबईतील विविध परीक्षा केंद्रांवर जाणार असून संबंधित मॉडरेटरकडून त्या उत्तरपत्रिका जमा करणार असल्याचे सांगवे यांनी सांगितले. यासाठी मॉडरेटर आणि शाळांनीही सहकार्य करावे, असे आवाहन सांगवे यांनी केले.

मुंबई विभागीय मंडळात दहावी आणि बारावीची सुमारे ८ लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यांचे सुमारे ५० लाखांच्या दरम्यान पेपर असून हे सर्व पेपर मंडळाकडून पोस्टाच्या माध्यमातून शाळांना पाठविण्यात येतात. मुंबईत कोरोनाचे संकट‍ गंभीर बनले असल्याने अनेक शाळांमधून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टातून परत आले होते. त्यात अनेक विषयांचे गठ्ठे होते. ते पुन्हा पाठविण्यात आले असून ते तपासून घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही सांगवे यांनी दिली.

इतिहासाच्या पेपरचे गठ्ठे शाळांमध्येच -

मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात असल्याने लॉकडाऊनच्या दोन दिवस अगोदर घेण्यात आलेला इतिहासाचा पेपर आणि त्याचे गठ्ठे अद्यापही शाळांमध्ये पडून आहेत. यातील अनेक गठ्ठे हे पोस्टातून मंडळाच्या कार्यालयात परत आले होते. मात्र, मंडळाने विविध प्रकारच्या यंत्रणा कामाला लावून त्या शाळांमध्ये पाठविण्याची सोय केली असली तरी अद्यापही इतिहासाचे लाखो पेपर तपासणीचे काम शिल्लक असल्याचे मुख्याध्यापक संघटनेच्या एका प्रतिनिधीने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.