ठाणे : १५ वर्षीय पीडित तरुणी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात कुटुंबासह राहते. ती भालगाव भागात असलेल्या एका कॉलेजमध्ये ११ मध्ये शिक्षण घेत आहे. त्यातच आरोपी आणि पीडित यांच्यामध्ये गेल्या वर्षीपासून ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर काही दिवसांनी दोघात प्रेम जुळले असता, २६ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून चार महिने पीडित त्याच्यासोबत दुचाकीवरून विविध ठिकाणी फिरत होती. याच दरम्यान पीडित तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने पीडितेच्या आईने त्यावेळी हिल लाईन पोलीस ठाण्यात आरोपी मंगेशवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणकर्त्यासह पीडित तरुणीला अहमदनगर मधून ताब्यात घेऊन अटक केली. तर पीडित तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
ब्लेड दाखूवन तिला मारण्याचा प्रयत्न : धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीचे अपहरण करून तिच्यावर आरोपीने अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केल्याने आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर गेल्याच महिन्यात आरोपी कारागृहातून जामिनावर सुटका करून आल्यानंतर ११ जानेवारी २०२३ रोजी दुपारच्या सुमारास पीडित तरुणीच्या कॉलेजच्या गेटवर आला. त्यावेळी पीडित तरुणी आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत उभी असतानाच आरोपी त्याठिकाणी येऊन तिच्या हाताला व डोक्याचे कसे पकडून तिला कॉलेजच्या मागच्या बाजूला नेऊन तिला अश्लील शिवीगाळ करत धारदार ब्लेड दाखूवन तिला मारण्याचा प्रयत्न करत असतानाच, पीडिताच्या मैत्रिणी तिला वाचविण्यासाठी धावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आरोपीने जाताना मी उद्या पुन्हा येईल म्हणून सांगून गेला.
अन् युवकाने काढला पळ : या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित तरुणीने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. पीडित तरुणीची कॉलेजमध्ये परीक्षा सुरु असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी २०२३ रोजी आईवडील पीडित तरुणीला घेऊन कॉलेजमध्ये आले होते. तर आरोपीही पुन्हा कॉलेजच्या गेटवर आला असता, पीडित तरुणीला हातवारे करून इशारा करीतच आई-वडील आरोपीला दिसल्याने त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
युवकाविरुद्ध गुन्हा दाखल : त्यानंतर पीडित तरुणीला घेऊन आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठून पीडितेवर घडलेल्या घटनेचे कथन करताच पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी मंगेशवर हिल लाईन पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४५, ३४५,(डी) सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला आज दुपारच्या सुमारास अटक केली. आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. तर या गुन्ह्याचा तपास हिललाईन पोलीस करीत आहेत.