ETV Bharat / state

भिवंडीत डेंग्यूने नवविवाहीत तरुणाचा मृत्यू; दोन महिन्यात डेंग्यूचा पाचवा बळी - bombay Hospital dengu News

सोमवारी सकाळी भिवंडी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन महिन्यात डेंग्यूच्या आजाराने आतापर्यंत पाच नागरिकांचे बळी गेल्याने शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशाल रमेश भंडारी
author img

By

Published : Oct 21, 2019, 6:04 PM IST

ठाणे- भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून तापसरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये मलेरिया, टायफाईड आदींसह डेंग्यू सारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यातच सोमवारी सकाळी भिवंडी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन महिन्यात डेंग्यूच्या आजाराने आतापर्यंत पाच नागरिकांचे बळी गेल्याने शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशाल रमेश भंडारी (व. २६ रा. शंखेश्वर दर्शन बिल्डिंग, गोकुळनगर) असे डेंगूच्या आजाराने बळी गेलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याला चार दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला डेंग्यू झाल्याचे तपासणीत उघड झाले होते. त्यामुळे त्याला तातडीने बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याची सोमवारी पहाटे प्राणज्योत माळवली.

त्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अजयनगर येथील हिंदू चिरशांती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापारी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा- भिवंडीत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, भिवंडी शहर महानगर पालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत ५८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी पाच जणांचे बळी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांनी रोजचा कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून गटार, नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात साथीचे रोग पसरत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- भिवंडीत अग्नितांडव : टिव्ही संच साठवलेल्या गोदामांना भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

Intro:kit 319Body: डेंगूच्या आजाराने नवविवाहीत तरुणाचा मृत्यू ; दोन महिन्यात डेंगूच्या आजाराचा पाचवा बळी

ठाणे : भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून तापसरीचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मलेरिया ,टॉयफाईड आदींसह डेंगू सारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले. त्यातच सोमवारी सकाळी भिवंडी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंगूच्या तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन महिन्यात डेंगूच्या आजाराने आतापर्यत पाच नागरिकांचे बळी गेल्याने शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

विशाल रमेश भंडारी ( २६ रा.शंखेश्वर दर्शन बिल्डिंग ,गोकुळनगर ) असे डेंगूच्या आजाराने बळी गेलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याला चार दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला डेंगू झाल्याचे तपासणीत उघड झाले होते. त्यामुळे त्याला तातडीने बॉंबे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याची सोमवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अजयनगर येथील हिंदू चिरशांती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापारी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, भिवंडी शहर महानगर पालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत ५८ डेंगूचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी पाच जणांचे बळी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी विधानसभेच्या निवडणूकीत व्यस्त असल्याने शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांनी रोजचा कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून गटार ,नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.