ETV Bharat / state

मीरा भाईंदरमध्ये युवक काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रम - Youth Dialogue Program

काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.

युवक काँग्रेस
युवक काँग्रेस
author img

By

Published : Dec 28, 2020, 10:36 PM IST

Updated : Dec 29, 2020, 6:52 AM IST

मीरा भाईंदर - काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन

पुढच्या निवडणुकीत १० पेक्षा अधिक युवा नगरसेवक-

भाईंदर पश्चिमेच्या सेकंडरी शाळेमध्ये मीरा भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने युवासवांद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवक अध्यक्ष दीप काकडे यांनी युवकांना संबोधित केले. शहरात अनेक समस्या आहेत. आपल्याला जनतेच्या घराघरात पोहचण गरजेचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत पुढच्या निवडणुकीत १० पेक्षा अधिक युवा नगरसेवक असतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

भारताचे संविधान धोक्यात-

इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर देशाच्या जनता काँग्रेस सोबत राहिली. सध्या देशाची परिस्थिती लक्षात घेता भाजप वाटोळं करायला निघालं आहे. भारताचे संविधान धोक्यात असून जनतेनं जागृत होणं गरजेचं आहे. भाजप फक्त जातीपातीचे राजकारण करत आहे. देशाच्या मोठ्या संस्थांचा गैरवापर होत असल्याचं मत माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- बीडमध्ये बालविवाहाने अनेक मुलींच्या सुखी स्वप्नावर 'कोयता'

Last Updated : Dec 29, 2020, 6:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.