ETV Bharat / state

प्रेमसंबंधाच्या संशयातून ठार मारण्याच्या धमकीने तरुणाची आत्महत्या, आरोपीस अटक - bhiwandi police latest news

अटक आरोपीची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि मृत लक्ष्मण उर्फ परश्या ह्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून आरोपीने २६ मार्च २०२२ ते ९ एप्रिल २०२२ दरम्यान मृत लक्ष्मणला भिवंडीतील नागाव रोडवरील गणेशपॉवर लॉंड्रीजवळ अडवून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. शिवाय त्याच्या कानशिलात देखील आरोपीने लगावली होती. यामुळे भयभीत झालेल्या लक्ष्मणने २ एप्रिलला राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते.

youth commits suicide by threatening to kill on suspicion of love affair in bhiwandi at thane
प्रेमसंबंधाच्या संशयातून ठार मारण्याच्या धमकीने तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Apr 23, 2022, 4:37 PM IST

ठाणे - प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून अल्पवयीन मुलीच्या बापाने एका तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीने भयभीत झालेल्या त्या तरुणाने उंदीर मारण्याचे विष औषध पिऊ आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना भिवंडीतील नागांव परिसरात घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्तसह विविध कालमानुसार गुन्हा दाखल होताच पोलिसांनी धमकी देणारा मुलीच्या बापाला अटक केली आहे. विजय ननकू यादव (वय ४५) असे अटक केलेल्या बापाचे नाव आहे. तर लक्ष्मण उर्फ परश्या नामदेव सूर्यवंशी (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपीची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि मृत लक्ष्मण उर्फ परश्या ह्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून आरोपीने २६ मार्च २०२२ ते ९ एप्रिल २०२२ दरम्यान मृत लक्ष्मणला भिवंडीतील नागाव रोडवरील गणेशपॉवर लॉंड्रीजवळ अडवून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. शिवाय त्याच्या कानशिलात देखील आरोपीने लगावली होती. यामुळे भयभीत झालेल्या लक्ष्मणने २ एप्रिलला राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा ९ एप्रिलला दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपीस अटक -या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर २० एप्रिल रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात मृत तरुणाच्या आईने गुन्हा दाखल करून (गुरुवारी ) २१ एप्रिल रोजी आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तर २२ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि नितीन सूर्यवंशी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.