ETV Bharat / state

भिंवडीमधील क्लब चालकाच्या उसनवारीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - आत्महत्या

गणेशने काही दिवसांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या कॅरम क्लब चालक अन्नू उर्फ अन्वर फय्याज शेख याच्याकडून ५ हजार रुपये उधारीवर घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी अन्नूने गणेशच्या मागे तगादा लावला होता.

मृत गणेश अंबादास गाजुल
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:56 PM IST

ठाणे - क्लब चालकाकडून घेतलेल्या उसनवारीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. भिंवडी शहरातील केजीएन चौकातील नवी वस्ती परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून गणेश अंबादास गाजुल (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गणेशने काही दिवसांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या कॅरम क्लब चालक अन्नू उर्फ अन्वर फय्याज शेख याच्याकडून ५ हजार रुपये उधारीवर घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी अन्नूने गणेशच्या मागे तगादा लावला होता. तसेच त्याला मारहाण देखील केली होती. सायंकाळपर्यंत पैसे परत न केल्यास पुन्हा बेदम मारण्याची धमकी दिली. त्याला घाबरून गणेशने बुधवारी सायंकाळी घरातील लोखंडी सळ्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गणेशच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी तत्काळ भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच धमकी देणाऱ्या अन्नू विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अन्नूविरोधात गुन्हा दाखल केला. आज त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:क्लब चालकाच्या उसनवारीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

ठाणे :- एका क्लब चालकाकडून उधारीने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी त्या चालकाने तरुणाकडे तगादा लावत त्याला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती ,
या धमकीला घाबरुन त्या तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला रस्सीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे,
ही घटना भिवंडी शहरातील केजीएन चौक नवी वस्ती परिसरात घडली आहे, गणेश अंबादास गाजुल वय 30 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे,

मृत गणेशने त्याच परिसरात राहणाऱ्या कॅरम क्लब चालक अन्नू उर्फ अन्वर फय्याज शेख वय 28 यांच्याकडून गेल्या दोन महिन्यापूर्वी उधारीवर पाच हजार रुपये घेतले होते, उसनंवारीचे पैसे परत घेण्यासाठी आरोपी अनु याने गणेशच्या मागे तगादा लावून त्याला मारहाण केली होती, तसेच त्याला पुन्हा मारहाण करून सायंकाळपर्यंत पैसे आणून दिलं नाही, तर तुला अधिक मारहाण करील अशी धमकी त्याने दिली होती, या धमकीला घाबरुन गणेश याने काल सायंकाळी राहत्या घराच्या लोखंडी अँगल ला रस्सीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली,

या घटनेची माहिती मृतक गणेशच्या कुटुंबाला मिळतातच त्यांनी तत्काळ भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेस जबाबदार असलेल्या अन्नू शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे , तर पोलिसांनीही या गुन्हाच्या आधारवर आरोपी अन्नू शेख ला आज अटक करून न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.