ETV Bharat / state

हॉटेलच्या काऊंटरची काच फोडल्याच्या वादातून मुलावर हल्ला; 7 जणांना अटक - टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला

हॉटेलच्या बाहेरील काऊंटरची काच फोडल्याचा जाब विचारणाऱ्या मुलासह त्याच्या वडिलांना ७ जणांच्या टोळक्याने लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बाजारपेठ पोलिसांनी या टोळक्याला गजाआड केले आहे.

जखमा झालेला अख्तर व त्याचे वडिल
author img

By

Published : Jul 2, 2019, 5:01 PM IST

ठाणे - हॉटेलच्या बाहेरील काऊंटरची काच फोडल्याचा जाब विचारणाऱ्या मुलासह त्याच्या वडिलांना ७ जणांच्या टोळक्याने लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना कल्याण पश्चिमेकडील आग्रा रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ऐलान बर्मावाला (वय ४५) यांनी बाजरपेठ पोलीस ठाण्यात या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बाजारपेठ पोलिसांनी या टोळक्याला गजाआड केले आहे.

अटक केलेल्या टोळक्यांना घेउन जाताना पोलीस

कल्याण पश्चिमेकडील आग्रारोड परिसरात बर्मावाला यांचे महाराष्ट्र ऍब्युलन्स सर्व्हिस व हॉटेल आहे. हॉटेलमध्ये बर्मावाला यांचा मुलगा अख्तर हा काल रात्रीच्या सुमारास हिशोब करीत होता. त्यावेळी त्याठिकाणी ६ ते ७ जणांच्या टोळक्याने अचानक काऊंटरची काच फोडली. काच फुटल्याचा आवाज एकून अख्तर त्या ठिकाणी येऊन पोहचला. त्याने टोळक्याला काच फोडण्याचे कारण विचारले. याच गोष्टीचा राग आल्याने टोळक्याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाला होत असलेली मारहाण पाहून बर्मावाला व त्यांचे मित्र त्याला वाचवायला गेले. मात्र, त्यांना देखील या टोळक्याने बेदम मारहाण केली. इतक्यात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने टोळक्याला पकडून बाजारपेठ पोलीस ठाण्यात कैद केले.

याप्रकरणी बर्मावाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी शंकर सुर्यवंशी, गणेश पाटील, संतोष गावडे, अमोल कदम, नितीन सुरनर, प्रल्हाद शिंदे, बळीराम उर्फ अमर गोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:हॉटेलच्या काऊंटरची काच फोडल्याच्या वादातून मुलासह समाजसेवकावर हल्ला; 7 जणांना अटक

ठाणे :- हॉटेलच्या बाहेरील काऊंटरची काच फोडल्याचा जाब विचारणाऱ्या मुलासह त्याच्या वडिलांना 7 जणांच्या टोळक्याने लाकडी बांबूच्या बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे,

ही घटना कल्याण पश्चिमेकडे आग्रा रोड परिसरात घडली आहे,
याप्रकरणी ऐलान बर्मावाला (४५) यांनी बाजरपेठ पोलीस ठाण्यात 7 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी या टोळक्याला गजाआड केले आहे,

कल्याण पश्चिमेकडील अग्रारोड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ऍब्युलन्स सर्व्हिसेमध्ये बर्मावाला यांचा मुलगा अकतर काल रात्री च्या सुमारास हिशोब करीत होता, त्यावेळी त्या ठिकाणी 6 ते 7 जणांच्या टोळक्याने अचानक काऊंटरची काच फोडली, काच फुटल्याचा आवाज आल्याने अकतर याने हल्लेखोर टोळक्याला जाब विचारला, याच गोष्टीचा राग येऊन जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने त्याला मारहाण करण्यास सुरवात केली, ही मारहाण पाहून बर्मावाला व त्याचा मित्र मध्ये पडला असता त्यांना देखील या टोळक्याने बेदम मारहाण केली, इतक्यात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने टोळक्याला पकडून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले,
याप्रकरणी बर्मावाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी शंकर सुर्यवंशी, गणेश पाटील, संतोष गावडे, अमोल कदम, नितीन सुरनर, प्रल्हाद शिंदे, बळीराम उर्फ अमर गोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे, अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत,

ftp foldar -- tha, kalyan bajarpeth 2.6.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.