ठाणे : देश अभिमान, देशभक्ती ही प्रत्येक भारतीयांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु भारतात जन्माला आल्यानंतर देशासाठी काहीतरी करावे असे स्वप्न प्रत्येकाचा असते. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्यदिनी भारताच्या सर्वोत्तम कार्यक्रमात सहभागी होण्याचे स्वप्न ठाण्यातील जानवीचे पूर्ण झालेले आहे.
जानवीसह तिच्या टीमच निवड : देशभक्तीपर अनेक नागरिक हे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात त्यातीलच प्रजासत्ताक दिन विशेष करून मानला जाणारा दिन, कार्यक्रम म्हणजे दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या चित्ररथात सहभागी होणे. दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली येथील राजपथावर ती भारतातील प्रत्येक राज्याचा चित्ररथ हा साकारला जातो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील हा चित्ररथ साकारला जात असून या चित्ररथासाठी खास करून व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून ठाण्यातील जानवीसह तिच्या टीमच निवड करण्यात आलेली आहे.
चित्ररथा सोबत करणार नृत्य : जानवी, तिची टीम या आगोदर देखील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत. परंतु दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या चित्ररथा सोबत नृत्य करणे हे जानवीच एक स्वप्न आता या निमित्ताने पूर्ण झाले आहे. जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जानवी ही एक महिना आधीपासूनच सराव करत असून राजपथावरती गेले पाच दिवस सराव करत आहे. अनेक राज्यभरातून होणारे या चित्रामध्ये महाराष्ट्रातील चित्रपट कशाप्रकारे उत्तम प्रकारे साकारता येईल याचे प्रयत्न जाहीर करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. भारतीयांचे प्रत्येक स्वप्न हे भारतासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी असतेच परंतु प्रत्येकालाच असे संधी प्राप्त होत नाही. तरुणांना देखील अशा प्रकारची संधी ही सहजासह मिळत नसते परंतु अत्यंत हलक्या दिवसावरती मात करून जानवी जानवीच्या कुटुंबीयांनी ही संधी प्राप्त केलेली आहे .
हालाकीची परिस्थिती : जानवीचे वडील हे वृत्तपत्र विक्रेते असून त्यांनी कठीण काळामध्ये मेहनत करून जानवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जानवीला नृत्य कलेची आवड असल्याचे कळल्यानंतर तिला कलाविष्कारामध्ये त्यांनी प्रोत्साहन देखील दिले. जानवीचे यश पाहून आमच्यासाठीही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. जानवीने देखील या मिळालेल्या संधीचे सोने करून नृत्यकलेचा आविष्काराने महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व करणार असल्याचे विश्वास यावेळी तिने व्यक्त केला. या संपूर्ण यशासाठी जानवीचे शिक्षक लीलाधर भोईर यांनी विशेष मेहनत घेतली असून त्यांच्या प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे जानवी सांगत आहे.
हेही वाचा - Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीत वंचितच्या एन्ट्री बाबत अद्यापही सस्पेन्स