ETV Bharat / state

कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी

गेल्या आठवड्यात उल्हासनगरमध्ये एका तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने बळी गेला होता, त्यापाठोपाठ कल्याणमध्येही डेंग्यूमूळे अजून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गणेशनगर परिसरात स्वच्छता व फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तर, येथील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनाला उशिरा जाग आल्याची टीका लोकांकडून होत आहे.

author img

By

Published : Jul 26, 2019, 6:42 PM IST

डेंग्यूमुळे मृत्यू: शुभम शिंदे

ठाणे - डेंगूचा सुळसुळाट सुरू झाला डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात उल्हासनगरमध्ये एका तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने बळी गेला होता, त्यापाठोपाठ कल्याणमध्येही डेंग्यूमूळे अजून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुन्हा एकदा पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

शुभम अर्जुन शिंदे (२२) असे निधन झालेल्या तरुणाचे नाव असून तो कल्याणच्या पश्चिमेला गणेश नगर परिसरात राहत होता. दोन दिवसांपासून त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे २:३० ला उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गणेशनगर परिसरात स्वच्छता व फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तर, येथील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे कालच मेंदूज्वराच्या आजाराने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे पालिका आरोग्य विभागाने तातडीने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना राबवण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:कल्याणात डेंगू सदृश्य आजाराचा पहिला बळी

ठाणे :- जिल्ह्यात विविध साथरोगाने हातपाय पसरल्याचे दिसून येत आहे त्यातच गेल्या आठवड्यात उल्हासनगरमधील एका तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने बळी गेला होता, त्यापाठोपाठ कल्याणातही डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे,
शुभम अर्जुन शिंदे वय 22 असे निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे,मृतक शुभम हा कल्याण पश्चिमेकडील गणेश नगर परिसरात राहत होता दोन दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते ,
मात्र आज पहाटे अडीज वाजल्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,

घटनेची माहिती मिळताच आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गणेश नगर परिसरात स्वच्छता व फवारणी करण्यास सुरुवात केली आहे , तर येथील राहणाऱ्या रहिवाशांच्या घरोघरी जाऊन रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले दुसरीकडे कालच मेंदू ज्वराच्या आजाराने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती यामुळे पालिका आरोग्य विभागाने तातडीने साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना राबविण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.