ठाणे : चार मित्र एकत्र एका घरात पार्टी करीत असतानाच २५ वर्षीय मित्राच्या पार्श्वभागात लाटणे घुसवून (wood rod penetrated in friends backside) त्या घृणास्पद कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण (Mobile filming of heinous act) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बदलापूर पूर्वेकडील मोहपाडा गावातील एका घरात घडला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पीडित मित्राच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल (case registered against friend) केला. या गुन्ह्याचा आधारे पोलिसांनी एका आरोपी मित्राला अटक केली (accused friend arrested) तर दोन फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. Latest news from Thane, Thane Crime
दारूची पार्टी सुरू असताना भयानक प्रसंग : तक्रारदार पीडित तरुण बदलापूर पूर्वेत राहत असून त्याचे आरोपी मित्रही मोहपाडा गावात राहतात. त्यातच १२ नोव्हेंबर रोजी मोहपाडा गावातील एका आरोपी मित्राच्या घरात रात्रीच्या सुमारास चौघे मित्र दारूची पार्टी करीत होते. पार्टी सुरू असतानाच, तीन आरोपी मित्रांनी पीडित मित्राच्या पार्श्वभागात लाटणे घुसवले. हे आरोपी मित्र एवढ्याच थांबले नाही तर या घृणास्पद कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हिडिओ तयार केला. पीडित मित्राच्या पार्श्वभागात लाटणे घुसवल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.
तो व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न : पीडित मित्राला गंभीर दुखापत झाल्याने त्याला बदलापूर मधील दोन ते तीन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दुसरीकडे आपली समाजात बदनामी होईल या भीतीने पीडित गप्प होता. मात्र यानंतर आरोपी तरुणांनी पीडित तरुणाला त्या घटनेचा व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तर त्याला झालेल्या दुखापतीचा अधिकच त्रास झाल्याने अखेर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात घृषास्पद प्रकार करणाऱ्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा आधारे पोलिसांनी एका आरोपी मित्राला अटक केली तर या प्रकरणातील इतर आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.