ठाणे - येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. 2 वर एका महिलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ठाणे-रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडली. नीला बाबुराव जाधव (वय 35, रा. जाधव निवास, तिरंदाज व्हिलेज, आयआयटी, मेनगेट, पवई) असे या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
यानंतर ती महिला जिवंत असल्याचे लक्षात येताच ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रदिप रणमाळ यांनी प्रवाशांच्या मदतीने या महिलेला सुरक्षित बाहेर काढून फलाट क्र. 3 वर नेले. या सर्व प्रकारामुळे सदर रेल्वे 25 मिनिटे थांबून होती.
हेही वाचा - राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची रेल्वे पोलिसांनी विचारपूस केली असता, ती महिला सिब्स एमआयडीसीमध्ये कार्यरत होती. मात्र, घरातील लोक तिच्यावर संशय घेत होते. मानसिक तणाव आणि सततच्या गैरहजेरीमुळे तिची नोकरी गेली. वडील आणि भाऊ व्यसनी आहेत, मधुमेहामुळे भूक जास्त लागते. मात्र, भावजय शिळे अन्न खायला देत असल्याचे तिने सांगितले. तिचे १२ वी विज्ञान शाखेपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तिला आता अजून पुढील शिक्षण घ्यायचे आहे. मात्र, घरातील लोक तिला पुढील शिक्षणासाठी पैसे देत नसल्याचेही तिने सांगितले. बुधवारी आई सोबत भांडण झाल्यानंतर तिच्या बहिणीने तिला रागाच्या भरात जीव दे, असे बोलल्याने तिने हा आत्महत्येचा प्रयत्न केला, असल्याचेही ती म्हणाली.
हेही वाचा - मेगा भरती एक दिवशी आम्हालाच बाहेर ढकलून देईल - रावसाहेब दानवे
दरम्यान, तिची विचारपूस केल्यानंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.