ETV Bharat / state

भिवंडीत अंधश्रद्धेपोटी महिलेला मारहाण करून कापले केस; भोंदूबाबासह 3 साथीदारांवर गुन्हा दाखल

पीडित महिलेवर जादूटोणा करून तिच्यापासून पिच्छा सोडवण्याचा या दाम्पत्याचा मानस होता. आरोपी विनोद आणि भोंदूबाबाशी संगनमत करून त्यांनी पीडित महिलेला पूजेसाठी बसवले. मात्र, पीडित महिला पुजेसाठी बसत नसल्याने आरोपींनी तिला जबर मारहाण करून तिचे केस कापले .

super
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 9, 2020, 8:45 PM IST

Updated : Jan 10, 2020, 9:05 AM IST

ठाणे - अंधश्रद्धेपोटी एका २८ वर्षीय महिलेला जबर मारहाण करून तिचे डोक्याचे केस कापल्याची घटना भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात घडली. पीडित महिलेने भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सुटका करून घेत नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी, पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून चारही आरोपी फरार आहेत. मनोज गोहिल, त्याची पत्नी जया गोहिल, विनोद चव्हाण आणि गुजराथी महाराज, अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भिवंडीतील कामातघर परिसरात पतीसह राहत होती. दरम्यान, आरोपी मनोज गोहिलशी तिचे प्रेमसंबध जुळल्याने ती आरोपी मनोज बरोबर राहू लागली. काही महिन्यांपूर्वी आरोपी मनोज विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी मनोज जामीनावर सुटून आला. त्यानंतर पीडित महिला पुन्हा त्याच्यासोबत राहू लागली.

हेही वाचा - सूर्यग्रहण अन् अंधश्रद्धा : कर्नाटकातील या गावात दिव्यांगाना पुरतात जमिनीत

आरोपीची पहिली पत्नी जया आणि पीडित महिला एकत्र राहत असल्याने त्या दोघींमध्ये सतत भांडण होत होते. त्यामुळे पीडित महिलेवर जादूटोणा करून तिच्यापासून पिच्छा सोडवण्याचा या दाम्पत्याचा मानस होता. आरोपी विनोद आणि भोंदूबाबाशी संगनमत करून पीडित महिलेला पूजेसाठी बसवले. मात्र, पीडित महिला पुजेसाठी बसत नसल्याने आरोपींनी तिला जबर मारहाण करून तिचे केस कापले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिसांनी चारही आरोपींवर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वाणी करत आहेत.

Intro:kit 319Body:२८ वर्षीय महिलेवर अघोरी कृत करून जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबासह ३ साथीदारांवर गुन्हा; आरोपी फरार

ठाणे : एका २८ वर्षीय महिलेवर अघोरी कृत करून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला अघोरी पूजेसाठी बसत नसल्याचे पाहून भोंदूबाबासह ३ साथीदारांनी तिला जबर मारहाण करून अघोरी कृत व जादूटोणा करण्यासाठी तिच्या डोक्यावरील केसही कापली आहे.
हि खळबळजनक घटना भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सुटका करीत नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मनोज शंकर गोहिल, त्याची पत्नी जया गोहिल, विनोद चव्हाण, असे आरोपींचे नाव आहे. तर गुजराथी महाराज असे भोंदूबाबाचे नाव असून या भोंदूबाबासह आरोपी असलेले गोहिल दांपत्य आणि त्याचा चुलत भाऊ (सर्व, रा. चरणीपाडा, भिवंडी ) हे चारही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय पीडित महिला भिवंडीतील कामातघर परिसरात पतीसह राहत होती. त्या दरम्यान आरोपी मनोज गोहिलशी तिचे प्रेमाचे सूत जुळल्याने तिने पहिल्या पतीला सोडून ती आरोपी मनोज बरोबर राहता होती. मात्र काही महिन्यापूर्वी आरोपी मनोज गोहिल विरोधात नारपोली पोलीस पीडित महिलेने त्याच्यावर अत्याचारा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात त्यावेळी पोलिसांनी मनोजला अटक केली होती. त्यांनतर आरोपी मनोज जमिनीवर सुटून बाहेर येताच पीडित महिला पुन्हा त्याच्या सोबत राहत होती. मात्र त्यावेळी आरोपीची पहिली पत्नी जया आणि पीडित महिला एकत्र राहत असल्याने त्या दोघीमध्ये सतत भांडण होत होते. यामुळे पीडित महिलेवर अघोरी कृत व जादूटोना करून तिच्यापासून पिच्छा सुटावा म्हणून आरोपी गोहिल दापंत्यानी चुलत भाऊ आणि एक गुजराथी भोंदूबाबाशी संगनमत करून पीडित महिलेला भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये नेऊन अघोरी पूजेसाठी बसवले. मात्र पीडित बसत नसल्याचे पाहून आरोपी गोहिल दापंत्यानी भोंदूबाबासह तिला जबर मारहाण करून अघोरी कृत व जादूटोणा करण्यासाठी तिच्या डोक्यावरीची केस कापली आहे.
दरम्यान, पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनतर पोलिसांनी मनोज गोहिल, त्याची पत्नी जया, चुलत भाऊ विनोदसह गुजराथी भोंदूबाबावर नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भादवी. कलम ३२४, ३२४, ५०४, ५०६, (२) ३४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भोंदूबाबासह चारही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) वाणी करीत आहेत.

Conclusion:bhiwnadi jadutona
Last Updated : Jan 10, 2020, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.