ठाणे - एका ट्रक भरधावने रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचारी महिलेला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत महिला रस्त्यावर पडली असता, चालकाने तिच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक भरधाव नेऊन दोन्ही पायाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड पुलालगत असलेल्या जकात नाक्यावर घडली आहे. त्यानंतर याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मनीषा गौतम धनगर (वय 55 वर्षे, रा. वळूगाव, मुरबाड), असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
पुलावरून खाली उतारावर 'यु-टर्न'मुळे अपघात
कल्याणहून मुरबाडच्या दिशेने आरोपी ट्रक चालक हा रविवारी (दि. 17 जाने.) सकाळच्या सुमारास शहाड पुलावरून जात होता. त्यावेळी पुलावरून खाली उतारावर यू-टर्न असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होती. त्यातच शहाडहून उल्हासनगर 1 नंबरकडे जखमी मनीषा ही महिला पायी जात असताना जकात नाक्यावर असलेल्या नीलकंठश्वर मंदिराच्या समोरच भरधाव ट्रक त्यांना धडक दिली. या धडकेत खाली पडल्याने ट्रक चालक न थांबता त्याने भरधाव ट्रक मनीषाच्या दोन्ही पायावरून नेऊन गंभीर जखमी केले.
वार्डननी केले महिलेला उपचारासाठी दाखल
अपघात होताच चालकाने ट्रक सोडून पळ काढला. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला वाहतूक विभागात कार्यरत असलेले वार्डन महेश जामघरे यांनी तातडीने रिक्षातून या महिलेला उपचारासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत अपघाताचा गुन्हा ट्रक चालकावर दाखल केला आहे. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - ‘चांगला रस्ता शोधून दाखवा’ स्पर्धेचे आयोजन करा; आव्हाड यांचा शिवसेनेला टोला