ETV Bharat / state

Thane Crime : बंदुकीचा धाक दाखवून ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा संस्थेचा अध्यक्ष गजाआड

बंदुकीचा धाक दाखवून ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला कोनगाव पोलिसांनी धुळे शहरातून बेड्या ठोकल्या आहे. कपिल वाल्मिक दामोदर (वय ३८ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, अटक आरोपी हा रिपाई आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नेत्याचा मुलगा आहे.

Thane Crime
बलात्कार करणारा संस्थेचा अध्यक्ष गजाआड
author img

By

Published : Feb 4, 2023, 10:31 PM IST

बलात्कार प्रकरणात केलेल्या कारवाईविषयी माहिती देताना पोलीस

ठाणे : सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नाशिक जिल्हातील घोटी परिसरात राहणारी आहे. तर आरोपी कपिल हा धुळे शहरात पत्नीसह राहतो. तो धुळे जिल्ह्यातील एका सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असून त्या माध्यमातून तो विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असल्याने दोन महिन्यांपूर्वीच आरोपी कपिलने धुळे शहरात महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पीडित महिला त्या कार्यक्रमात गेली असता, तिथे तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन आरोपीकडे तिने पतीपासून विभक्त रहात असल्याचे सांगितले. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने पीडित महिलेशी जवळकी साधली.

लॉजवर नेऊन बलात्कार : आरोपीने पीडितेला मुंबईला सामाजिक कामाच्या बहान्याने नेले. यानंतर भिवंडी तालुक्यातील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजच्या खोलीत पीडितेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित महिलेला त्याने लग्नाचे आमीष दाखवून वेळ मारून नेली. त्यानंतर पीडित महिलेवर भिवंडी, कल्याण परिसरातील लॉज नेऊन आरोपी दोन महिन्यापासून वारंवार अत्याचार करीत होता.

बलात्कारनंतर लग्नाचे आमीष : पीडित महिलेला कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर आरोपी घेऊन आला होता. त्यावेळी पीडित महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता, तो टाळाटाळ करीत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तिने १ फेब्रुवारीला कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर घडलेला प्रसंग महिला पोलीस अधिकाऱ्याकडे कथन केला. आरोपी कपिलवर कोनगाव पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

७ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी : गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेणवे, पोलीस हवालदार सुनील पाटील, पोलीस शिपाई, कुशल जाधव या पथकाने धुळे शहरातून आरोपीला २ फेब्रुवारीला सापळा रचून अटक केली. आरोपीला ३ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता ७ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. आरोपीने ज्या बंदुकीने धाक दाखवून पीडित महिलेवर अत्याचार केला त्या बंदुकीचा आरोपीकडे शासकीय परवाना असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : Kalyan Murbad Railway Line Approval: कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.