ETV Bharat / state

चोरट्याचा पाठलाग करतानाचा महिला पोलिसाचा थरार सीसीटीव्हीत कैद, चोरटा गजाआड

या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्याबरोबर त्याचा साथीदार असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले.

चोरट्याचा पाठलाग करताना महिला पोलीस
author img

By

Published : Jul 13, 2019, 2:48 PM IST

ठाणे - महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे भरदिवसा 3 लाख रुपयांची रोकड पळवणारा अल्पवयीन चोरटा गजाआड झाला आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलिसाने या चोरट्याला पाठलाग करून पकडले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शोभा जाधव असे चोरट्याचा पाठलाग करून 3 लाखांची रोकड त्याच्याकडून हस्तगत केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

चोरट्याचा पाठलाग करताना महिला पोलीस

कल्याण पश्चिम परिसरातील बेतुरकर पाडा येथे राहणारे रामजी गुप्ता हे काल दुपारच्या सुमारास शंकरराव चौक येथून बँकेतून तीन लाखांची रोकड काढून घरच्या दिशेने परतत होते. सदानंद चौक येथून पायी जात असताना एका अल्पवयीन चोरट्याने मागून येऊन त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारत तीन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. यावेळी गुप्ता यांनी आरडाओरड केली. याचदरम्यान वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई शोभा जाधव या सदानंद चौकात वाहतूक नियोजनाचे काम करीत होत्या. आरडाओरड ऐकून त्यांचे त्या पळणार्‍या चोरट्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:महिला पोलिसाचा चोरट्याच्या मागे पाठलाग करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे भरदिवसा 3 लाखाची रोकड पळविणारा अल्पवयीन चोरटा गजाआड झाला आहे, विशेष म्हणजे महिला पोलिसाचा त्या चोरट्याच्या मागे पाठलाग करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे,
शोभा जाधव असे चोरट्याचा पाठलाग करून 3 लाखांची रोकड त्याच्याकडून हस्तगत केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे,
कल्याण पश्चिम परिसरातील बेतुरकर पाडा येथे राहणारे रामजी गुप्ता हे काल दुपारच्या सुमारास शंकरराव चौक येथून बँकेतून तीन लाखांची रोकड काढून घरच्या दिशेने परतत होते, सदानंद चौक येथून पायी जात असताना अल्पवयीन मुलाने त्यांचा पाठलाग करीत संधी साधून या अल्पवयीन चोरट्या ने त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारत तीन लाखाची रोकड असलेली पिशवी हिसकावून तेथून पळ काढला , यावेळी गुप्ता यांनी आरडाओरड केली याच दरम्यान वाहतूक विभागात कार्यरत पोलिस शिपाई शोभा जाधव ह्या सदानंद चौकात वाहतूक नियोजनाचे काम करीत होत्या ,आरडाओरडा ऐकून त्यांचे त्या पळणार्‍या चोरटयाकडे लक्ष गेले, महिला पोलीस शिपाई जाधव यांनी प्रसंगावधान राखत या मुलाचा थरारक पाठलाग करत त्याला पकडले, या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले असून या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या मुलाबरोबर त्याचा साथीदार असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.