ETV Bharat / state

Financial Fraud With Woman: तंत्रमंत्राद्वारे मतिमंद दिराच्या उपचाराचा दावा करत महिलेची लाखो रुपयांनी फसवणूक - pretext of treating mentally retarded person

मतिमंद दिराला तंत्रमंत्र विद्या करून जादूटोण्याने बरे करण्याची थाप (pretext of treating mentally retarded person) मारून एका भोंदूबाबाने भावयजला लाखोंचा गंडा (woman cheated of lakhs rupees) घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कोळीवाडा परिसरातील एका इमारतीत घडली आहे. Latest news from Thane, Thane Crime, Financial Fraud With Woman

Muslim Tantrik Arrest
भाेंदूबाबा अटक
author img

By

Published : Nov 16, 2022, 7:37 PM IST

ठाणे : मतिमंद दिराला तंत्रमंत्र विद्या करून जादूटोण्याने बरे करण्याची थाप (pretext of treating mentally retarded person) मारून एका भोंदूबाबाने भावयजला लाखोंचा गंडा (woman cheated of lakhs rupees) घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कोळीवाडा परिसरातील एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भोंदूबाबाविरुद्ध भादंवि कलम ४२० सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठा व अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल (case registered under Witchcraft Act) अटक केली आहे. मोहम्मद आसिफ मोहम्मद अरिफ हिंगोरा (वय ३७, रा, घोडबंदर गायमुख ठाणे) असे अटक (Tantrik arrested) केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. Latest news from Thane, Thane Crime, Financial Fraud With Woman

भाेंदूबाबा अटक

मतिमंद युवकाला बरे करण्याची दिली थाप - कल्याण पश्चिम भागातील कोळीवाडा परिसरात असलेल्या नवाज इमारतीमध्ये तक्रारदार आरीफा ईरफान मुलानी (२९) ह्या कुटुंबासह राहतात. त्यांचा लहान दीर अजीज मुलानी हा मतिमंद असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यातच जानेवारी २०२१ रोजी भोंदूबाबाची ओळख आरीफा यांच्याशी झाली होती. त्यावेळी भोंदूबाबा त्यांनी आपला दीर मतिमंद असून त्याला लवकर बरे करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी भोंदूबाबाने दिराला तंत्रमंत्र विद्या आणि जादूटोणा करून बरे करण्याची थाप मारून त्यासाठी तुम्हाला पूजेचा खर्च करावा लागले असे सांगितले.

अन् भोंदूबाबा झाला फरार- भोंदूबाबाच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवून दिरावर उपचार करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी भोंदूबाबा आरीफा यांच्या राहत्या घरात दिरावर अघोरी कृत्य आणि जादुटोणाच्या नावाने अगरबत्ती आणि धूप जाळून दिरावर उपचार करीत होता. मात्र दोन वर्षांत त्याने अघोरी पूजेच्या ५ लाख ३९ हजार रुपये उकळले होते. दीर बरा होत नसल्याचे आरिफाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बाजारपेठ १ एप्रिल २०२२ रोजी भोंदूबाबावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण आरोपी भोंदूबाबाला लागल्याने तो फरार झाला होता.

भोंदूबाबाला अटक- पोलीस पथक गेल्या ८ महिन्यापासून आरोपी भोंदूबाबाचा शोध घेत असतानाच, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपी ठाण्यातील तीन हात नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. हा भोंदूबाबा मूळचा वर्धा जिल्ह्यात राहणार असून गेल्या १४ वर्षांपासून तो पत्नीसह घोडबंदर रोडवरील गायमुख भागात राहत आहे. त्याला ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

पाच दिवसांची पोलीस कोठडी- आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपीने आणखी कोणाची जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे का? याचा तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.