ETV Bharat / state

Poisoning On Husband : कलीयुगी पत्नीचा प्रताप! इंजिनियर पतीसह सासूवर विषप्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न

इंजिनियर पतीची संपत्ती हडपता यावी यासाठी चक्क पत्नीनेच पतीसह तिच्या सासूवर विषप्रयोग करून दोघांनाही संपविण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये तिला पतीचा चुलत भाऊ, त्याची पत्नी आणि मोलकरणीने साथ दिली. मात्र घरातील एका प्रामाणिक मोलकरणीने पतीला सतर्क करून हा मोठा कट उधळून लावला. याप्रकरणी पतीने ठाणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिली. यानंतर चौघाही संशयितांनी न्यायालयात धाव घेऊन जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने तो जामीन अर्जच फेटाळून लावला.

Poisoning On Husband
पतीवर विषप्रयोग
author img

By

Published : Aug 19, 2023, 4:32 PM IST

सुमेध भवार त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगताना

ठाणे : इंजिनियर पतीसह सासूला जेवणातून विषारी पावडर टाकून संपत्ती हडपण्यासाठी जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. संचिता भवार (पत्नी), राहुल गुलाब भवार (चुलत भाऊ) आणि सुनीता भवार तसेच मोलकरणी सुनीता असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून पत्नीसह चौघांनी कल्याण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता. मात्र अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्नीसह चौघांचाही अर्ज फेटाळला आहे.

सुमेध आणि संचिताचा प्रेमविवाह : अंबरनाथ पूर्व भागातील नवरे नगरमधील रॉयल पार्कमध्ये तक्रारदार सुमेध भवार कुटुंबासह राहत असून ते पेशाने इंजिनियर आहे. त्यांची अंबरनाथ एमआयडीसीमध्ये 'पाईप टेक इंजिनियरींग' या नावाने कंपनी आहे. त्यातच सुमेध यांची संचिताशी ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी त्यांचा विवाह ९ ऑगस्ट २००९ रोजी मोठ्या थाटात लावून दिला. विवाहाच्या तीन वर्षांत दोन मुले झाली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होऊ लागले. त्यामुळे पत्नीने २०१३ साली महिला तक्रार निवारणमध्ये पती विरोधात अर्ज दिला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये नातेवाईकांनी समेट घडवून यापुढे वाद होणार नाही, असे सांगत प्रकरण मिटवले.

असे फुटले बिंग : सुमेध यांच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेने त्यांना तुमची पत्नी, चुलत भाऊ हे जेवण तयार करणाऱ्या सुनीता मोलकरणीच्या मदतीने तुमच्या जेवणात पावडर टाकत असल्याची माहिती दिली. तसेच त्या पावडरची पुडी सुमेध यांना दिली. त्यांनी ती पावडर नवी मुंबईतील एका लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून डॉक्टरचा सल्ला घेतला. दुसरीकडे पावडर विषारी द्रव असल्याचा अहवाल लॅबकडून मिळाला. मात्र तोपर्यंत सुमेध यांना शारीरिक त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरकडे जाऊन उपचार सुरू केले. दरम्यान आईलाही त्रास होत असल्याचे पाहून त्यांनी आईची डॉक्टरकडे तपासणी केली. यावेळी दोघांनाही सारखाच शारीरिक त्रास जाणवत असल्याचे समोर आले. त्यानंतर सुमेध यांनी इंटरनेटवर या पावडर संबंधी माहिती पाहिली असता, मुंबईतील एक घटना त्यांच्यासमोर आली. त्यामध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या जेवणात पावडर घालून मारल्याचे त्यांना समजले.

अखेर पोलिसात तक्रार : गुन्हा दाखल झालेले चौघेही गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुमेधसह त्यांच्या आईच्या जेवणात विषारी पावडर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सुमेध यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर याप्रकरणी सुमेध भवार यांनी १७ जून २०२३ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संपत्ती हडपण्यासाठी पत्नी संचिता भवार, त्यांचा चुलत भाऊ राहुल भवार आणि त्याची पत्नी सुनीता तसेच त्यांची मोलकरणी सुनिता भक्तीयानी या चौघांनी कट रचल्याचे तक्रारीत नमूद केले. यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला; मात्र या प्रकरणी पोलिसांनी अजूनही कोणाला अटक केली नाही.

आरोपींना अटक करा : दुसरीकडे कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० ऑगस्ट, २०२३ रोजी या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळल्याने याप्रकरणी या सर्वांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सुमेध भवार यांनी केली आहे. त्यामुळे या सर्वांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल असलेल्यापैकी कोणलाही अटक केली नसल्याचे सांगितले.

हेही वाचा:

  1. Murder In Pune : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून
  2. दीराशी अनैतिक संबंध भावाच्या मदतीनेच केली पतीची हत्या Kanker Murder Case
  3. नांदेडमध्ये विषप्रयोग करून महिलेची हत्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.