ETV Bharat / state

पतीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी पत्नी व एकास जन्मठेप - Fake suicide news Thane

आपल्याच पतीची हत्या करून सहकाऱ्याच्या मदतीने त्याचा मृतदेह फॅनला लटकावून आत्महत्येचा बनाव केल्या प्रकरणी पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरीत बार बाला रुकय्या बहादूर खान (वय २९) आणि शरीफ उर्फ चिप्पी अशरफ शेख (वय ३५) याला अतिरिक्त सेशन न्यायालयाने दोषी ठरवले.

Suicide case in Thane
आत्महत्या बनाव प्रकरण ठाणे
author img

By

Published : Jan 5, 2021, 6:53 PM IST

Updated : Jan 5, 2021, 7:50 PM IST

ठाणे - आपल्याच पतीची हत्या करून सहकाऱ्याच्या मदतीने त्याचा मृतदेह फॅनला लटकावून आत्महत्येचा बनाव केल्या प्रकरणी पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरीत बार बाला रुकय्या बहादूर खान (वय २९) आणि शरीफ उर्फ चिप्पी अशरफ शेख (वय ३५) याला अतिरिक्त सेशन न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांवर प्रत्येकी ६ हजाराचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती आर.आर. वैष्णव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. तर, याच गुन्ह्यात अटक झालेला आरोपी धनराज पोमा चव्हाण (वय २३) याची सबळ पुराव्या अभावी सुटका करण्यात आली.

सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंतर मृतक बहादूर युसूफ खान (वय ३०) हा फॅनला लटकलेल्या अवस्थेत कळवा येथील घरात सापडला. दरम्यान तपास अधिकारी पोलीस निरीक्षक तुकाराम पोवळे यांनी तपास केला. आणि अखेर आरोपी रुकय्या (मृतकाची पत्नी), शरीफ उर्फ चिप्पी आणि धनराज याला अटक केली. पोलीस तपासात समोर आले की, मृतक बहादूर याला त्याची पत्नी रुकय्या हिने बारमध्ये कामाला जाणे पसंद नव्हते. म्हणून याच विषयावर दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत होती. रुकय्या आणि तिच्या सहकाऱ्यांनी बहादूर याची हत्या करून त्याचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकविला आणि आत्महत्या असल्याचे भासवले. रुकय्या घरी आल्यानंतर रडू लागली आणि तिने पतीने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा - औरंगाबाद नामकरण वाद; कपिल पाटलांचा अबू आझमींवर निशाणा

दरम्यान हत्या आणि आत्महत्येचा हा प्रकार रुकय्याच्या मुलीने पहिला. तिने पाहिलेला प्रकार सांगितला. आणि जबानी नोंदविली. तीच जबानी मुलीने न्यायालयात अंतिम सुनावणी पर्यंत कायम ठेवली. न्यायालयाने मुलीची जबानी आणि शवविच्छेदन रिपोर्ट ग्राह्य धरली. तर, बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, घटनास्थळ हे वर्दळीचे स्थळ आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी स्थानिक जागामालक, शेजारी यांची साक्ष तपासली नाही. तर, लहान मुलीची साक्ष ही पुरेशी नाही. दरम्यान न्यायमूर्ती आर.आर. वैष्णव यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकरणात कुणीही सहभाग दर्शविण्यास पुढे येत नाही. तेव्हा साक्षीदार तपासले नसल्याचा फायदा आरोपीला होऊ नये.

सरकारी वकील आणि तपास यंत्रणांनी सबळ पुरावे सादर केलेले आहेत. त्यामुळे, मृतक बहादूर याने आत्महत्या केलेली नाही, तर आरोपी युसूफ खान याने त्याचा गळा दाबून प्रथम हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह फॅनला लटकावून आत्महत्येचा बनाव तयार केल्याचे स्पष्ट होते. असे असल्याने आरोपी रुकय्या आणि शरीफ उर्फ चिप्पी अशरफ शेख याला हत्या आणि आत्महत्येचा बनाव प्रकरणी दोषी ठरवीत प्रत्येकी ६ हजाराचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर, एका आरोपीची निर्दोष सुटका केल्याचा निकाल न्यायमूर्ती आर.आर. वैष्णव यांनी दिला.

हेही वाचा - विना नंबर प्लेटच्या रिक्षाची दुचाकीला धडक

Last Updated : Jan 5, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.