ETV Bharat / state

भारतात म्युकरमायकोसिसचे संकट; ब्लॅक आणि व्हाईट फंगसबद्दल नागरिकांमध्ये गैरसमज

म्युकरमायकोसिस आजार ही महामारी आहे, असे आपण तेव्हाच म्हणू शकतो. जेव्हा कमी वेळात जास्त रुग्ण दगावले जातात. अशा रोगाचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत जातो. म्हणून महाराष्ट्रात अजून तरी ब्लॅक फंगस महामारी म्हणून घोषित केलेली नाही. ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य रोग नाही, कोविड झालेल्या नागरिकांना हा रोग होण्याची शक्यता आहे.

म्युकरमायकोसिसचे संकट;
म्युकरमायकोसिसचे संकट;
author img

By

Published : May 23, 2021, 12:37 PM IST

ठाणे- भारतात कोरोना महामारीचे संकट अद्यापही सुरू असतानाच 'म्युकरमायकोसिस'चे (Mucormycosis) या काळ्या बुरशीजन्य संसर्गाच्या संकटाने शिरकाव केला आहे. देशभरात या जीवघेण्या रोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या रोगाचा साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. करोना संकटादरम्यान देशात 'काळी बुरशी' अर्थात 'म्युकरमायकोसिस'चे आत्तापर्यंत तब्बल ८८४८ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण गुजरात राज्यात आढळल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. यापैंकी २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या रोगाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या टास्क फोर्सकडून माहिती देण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिसचे संकट;

ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य रोग नाही-

याबाबत टास्क फोर्सचे सदस्य संजय ओक सांगतात, म्युकरमायकोसिस आजार ही महामारी आहे, असे आपण तेव्हाच म्हणू शकतो. जेव्हा कमी वेळात जास्त रुग्ण दगावले जातात. अशा रोगाचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत जातो. म्हणून महाराष्ट्रात अजून तरी ब्लॅक फंगस महामारी म्हणून घोषित केलेली नाही. ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य रोग नाही, कोविड झालेल्या नागरिकांना हा रोग होण्याची शक्यता आहे. कोविडचा परिणाम देखील म्हणून आपण याकडे पाहू शकतो. या रोगासाठी देखील टास्क फोर्सने वेगळी नियमावली राज्य सरकारला दिलेली आहे. आपण काळजी घेतली तर या रोगाला देखील रोखू शकतो.

कोरोनानंतर रोग होण्याची शक्यता-

व्हाईट फंगस असा कोणताही वेगळा आजार नाही. तो ब्लॅक फंगसप्रमाणेच आहे. बिहारमध्ये आलेला हा रोग येथे असलेला रोगाप्रमाणेच आहे. कोरोना नंतर हा रोग होण्याची शक्यता जास्त आहे. ब्लॅक फंगस असा हा मुळातच त्याच्या गुणांवरून नावारूपाला आलेला आहे. हा फंगस मुळात पांढरा किंवा राखाडी रंगाचा असतो. याची लागण झाल्यानंतर शरीरात ज्या ठिकाणी हा होतो, त्या ठिकाणी असलेली पेशी हा मारून टाकतो. त्यानंतर तेथील भाग हा काळा होतो. रोग नाकाच्या बाजूला, डोळ्याच्या बाजूला व मेंदू मध्ये फुप्फुसांमध्ये होतो. कोरोनानंतर जर आपण नीट काळजी घेतली तर या आजाराला देखील आपण रोखू शकतो, अशी माहिती डॉ. श्रीकांतराजे यांनी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.