ETV Bharat / state

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;भातसा धरणाच्या ३ दरवाजातून विसर्ग सुरू - thane rain update

जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा धरण भरल्याने ३ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भातसा धरण भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तानसा आणि मोडकसागर ही धरणे यापूर्वीच भरली आहेत.

Bhatsa dam
भातसा धरण
author img

By

Published : Aug 22, 2020, 4:26 PM IST

ठाणे- शहापूर तालुक्यात काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने ते भरुन वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. भातसा धरणाच्या ३ दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तालुक्यातील तानसा व मोडकसागर ही धरणे याआधीच भरुन वाहू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

जुलै, ऑगस्ट महिन्यांचे काही दिवस कडक उन्हाचे गेल्याने यावर्षी धरणे भरणार का?, शेती करता येईल की नाही, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहापूर तालुक्यातील सर्व धरणे भरुन वाहू लागली आहेत. भातसा धरण देखील पूर्ण भरले असून धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात सुरु करम्यात आला आहे. भातसा धरण क्रमांक-१ चे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी आमदार दौलत दरोडा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय निमसे, मनोज विशे यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उचलले.

भातसा धरणाच्या 3 दरवाजातून विसर्ग सुरु

५ दरवाजे असणाऱ्या भातसा धरणाची भरुन वाहण्याची पातळी ही १४२ मीटर आहे. आजची पाणीपातळी १३९.८० मीटर असून पाण्याचा अंदाज घेऊन धरणाचे तीन दरवाजे २५ सेमीने वर उचलले आहेत. या धरणाच्या नदीपात्राजवळ असणाऱ्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि ठाणे शहराच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरण क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. या धरणात सध्या ५९ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.

उल्हास नदीवरील शहाडजवळील मोहने बंधारा येथून स्टेम प्राधिकरणाद्वारे मनपा, भिवंडीच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीला कर्जतजवळ भीवपुरी येथील टाटांच्या मालकीच्या या आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. यावर्षी या धरणात केवळ ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आंध्रात धरणात पाणीसाठा तयार होईल. आजमितीस धरणामध्ये २०२ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. बारवी धरण भरुन वाहण्याकरिता त्यामध्ये अवघा १.९५ मीटर साठा होणे बाकी आहे. तर बारवी धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ते लवकरच भरण्याचे चिन्हे दिसत आहे. शुक्रवारी या धरण परिसरात सरासरी ८६ मि.मी. पाऊस पडला. मोडकसागर १०० टक्के तर तानसा ९९.५८ टक्के भरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.