ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका हद्दीत अनेक ठिकाणीं पाणी कपातीचे संकट उभे आहे. तर दूसरीकडे शहरालगत असलेल्या, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील येऊर मधील निसर्गरम्य आदिवासी पाड्यात पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. तब्बल ९ दिवसांनी स्थानिक नागरीकांना पाण्याचा टँकर पोहचल्याने पण्यासाठी झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे स्मार्ट सिटीच्या ठाण्यात आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणावर हॉटेल, बंगले आणि ढाबे आहेत. त्यांना पाणीपुरवठा केला जातो, मात्र स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
अनेक भागांमध्ये इतका पाणी पुरवठा: ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४०० हून अधिक दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराचे गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरिककरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत होता. अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणी देण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेला भातसा धरणातून वाढीव पाणी दिले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही शहराला वाढीव पाणी मंजुर केले. यामुळे शहरात आता दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे.
स्मार्ट सिटीच्या ठाण्यात येऊर येथील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. हॉटेल, बंगले आणि ढाबे यांना पाणीपुरवठा केला जातो, मात्र स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्यामुळे शाळेला सुट्टी पडते. तब्बल ९ दिवसांनी स्थानिक नागरीकांना पाण्याचा टँकर गावात येतो. - आदिवासी ग्रामस्थ
आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई: दरम्यान काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागांत टंचाईची समस्या निर्माण होते. त्यापाठोपाठ डोंगर भागात असलेल्या येऊर मधील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. येऊर भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. पाटनोपाडा, जांभूळपाडा, धर्माचापाडा, देवाचा पाडा, वणीचापाडा या अनेक आदिवासी पाड्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. याठिकाणी जुन्या कुपनलिका आणि विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. तर काही ठिकाणी महापालिकेच्या जलवाहीनीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु याद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नाही.
प्रशासनाकडे टँकरची मागणी: गेली ८ दिवस पाणी आलेच नाही. उन्हातान्हत पाण्यासाठी फिरावे लागत आहे. गेली आठवडाभर कोणाच्या घरात अंघोळ करायला पाणी नाही. तसेच पाणी नसल्याने पाहुणे पण बोलवता येत नाही असे ग्रामस्थ सांगतात. सद्या लग्नसराईचे दिवस असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही स्थानिक असून पाण्यासाठी आम्हाला दुसऱ्याच्या दारात जावे लागत आहे. कुठलेतरी हॉटेल, ढाबे किंवा एखाद्या बंगल्याच्या मालकांना पिण्याच्या पाण्यासाठी विनवणी करावी लागते. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाण्याची सोय करावी आणि दररोज टँकर पाठवावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
टाक्या खूप पण पाणीच नाही: येऊर मधल्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य आदिवासींना बालिका प्रशासनाने पाण्याच्या टाक्यात लावून दिल्या. मात्र या टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येत नाही त्यामुळे या टाक्या काहीही उपयोगाच्या नाहीत असे आदिवासी सांगतात. पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना अनेक किलोमीटर चालत जाऊन, झऱ्याचे पाणी, विहिरीचे पाणी आणावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात खूप नळी केला परंतु, पाणी येत नसल्यामुळे विहिरीतल्या आणि घराच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याचे आदिवासी माहिला सांगतात.
पाण्यामुळे शाळेला पडते सुट्टी: येऊर मधल्या पाण्याच्या असुविधेमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आपल्या शाळा सोडावे लागतात. तर कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला दांडी मारून पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेकडो वर्षापासून आम्ही आमचे पूर्वज येथे राहत असून आम्हाला पाणी मिळत नाही, तसचे गावात बंगले उभारून गार्डन बनवणाऱ्या लोकांना गार्डनसाठी पाणी उपलब्ध होत असल्याचे आदिवासी माहिला सांगतात. त्याचबरोबर दुरुस्तीच्या कामासाठी घेतलेल्या वॉटरकटमुळे पुढील दोन ते तीन दिवस पाणी कमी दबावाने येते. म्हणूनच येऊर परिसरामध्ये पाणी नसल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन ते तीन दिवसा ऐवजी जवळपास आठ दिवसानंतर टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा -