ठाणे: सध्या तापमानाच्या पाऱ्याने कमालीची पातळी गाठली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना गेले काही दिवस दिसत आहे. उष्म्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच, निसर्गात स्वच्छंद बागडणाऱ्या पक्षांना देखील यांची झळ बसू लागली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पक्षांना बसू नये, तसेच त्यांना योग्य प्रमाणात अन्न आणि पाणी कसे मिळू शकेल, यासाठी आता ठाणेकर सरसावले आहे.
विंडोबर्डींग माहितीपट तयार केला: गेली अनेक वर्ष या पक्षांच्या अन्न - पाण्याची काळजी घेण्यात खारीचा वाटा उचलला आहे. तो म्हणजे ब्रह्मांड इथल्या सीमा शेखर राजेशिर्के यांनी. पक्षी निरिक्षणातून पक्षांच्या फोटोग्राफीची आवड निर्माण झालेल्या सीमा यांना आता सर्वत्र बर्ड फोटोग्राफीसाठी तसेच त्यातच 'विंडोबर्डींग'साठी ओळखले जातात. आपला छायाचित्रणाचा छंद जपताना चलचित्रफितींचा संग्रह करून त्यांनी पक्षांवरील 'विंडोबर्डींग' माहितीपट तयार केला.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानाचा फटका पक्षांना बसू नये, तसेच त्यांना योग्य प्रमाणात अन्न आणि पाणी दिले पाहिजे. - फोटोग्राफर सीमा राजेशिर्के
प्रथम क्रमांकाचे पारिताेषीक: विंडोबर्डींग या माहिती पटला पुढे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धेत महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारिताेषीक मिळाले. तसेच पुणे येथे घेतल्या जाणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा अंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
पक्षांची विशेष काळजी: सीमा शेखर राजेशिर्के यांच्या घराच्या खिडकीत अनेक पक्षी नियमित हजेरी लावतात. यात काही स्थानिक तर काही स्थलांतरित पक्षी देखील आहेत. तापमानाचा पारा चढल्यामुळे सध्या सीमा आपल्या पक्षांची विशेष काळजी घेत आहे.
सामाजिक कामाचा आढावा: सीमा शेखर राजेशिर्के यांना पक्षी निरिक्षणातून पक्षांच्या फोटोग्राफीची आवड लागली. व्हिडीओ शुटिंगचे तंत्रही अवगत करून घेतले. पक्ष्यांच्या छाया चित्रांची विंडोबर्डींग या नावाने प्रदर्शने भरवली. यातून जनमानसात आपल्या घरा भोवतालचा परीसर, झाडे, पक्षी या कडे बघण्याचा अभ्यासपूर्ण द्रुष्टिकोन निर्माण झाला.
शासनाचे राज्यस्तरीय पारिताेषीक: फोटोग्राफी करतानाच, चलचित्रफितींच्या संग्रहावरून पक्षांवरील माहिती पट तयार केला. त्याचे नांव ही विंडोबर्डींगच ठेवले. विंडोबर्डींग माहितीपटाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धेत महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारिताेषीक मिळाले. तसेच पुणे येथे घेतल्या जाणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा अंतरराष्ट्रीय स्पर्धेत २०१६ मधे विंडोबर्डींग माहितीपटाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
पुरस्काराने गौरविण्यात आले: ठाणे शहराचा ठाणे गुणीजन पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. वर्तमानपत्रे,आकाशवाणी त्याच बरोबर दुरदर्शनच्या सह्याद्री, द्रुकश्राव्य माध्यमातून विंडो बर्डींगचे कार्य आणखी समाजापर्यंत पोहचविले. पर्यावरण दक्षता मंडळ, ठाण्यातील निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन यावर काम करणारी संस्था, त्यांच्या कार्यक्रमांमधे महाराष्ट्रातील शाळांमधील, मुलांमधे निसर्ग संवर्धनाचे आवड निर्माण होण्यासाठी वेगवेगळे माहिती पट दाखवले गेले. त्यात विडोबर्डींग हा माहितीपट देखिल खारीचा वाटा उचलत आहे. तर किर्लोस्कर वसुंधरा भारतभर होणाऱ्या त्यांच्या निसर्ग संवर्धन कार्यक्रमामधून वेगवेगळे माहिती पट दाखवत असते. त्यातही विडोबर्डींग माहितीपट खारीचा वाटा उचलत आहे.
हेही वाचा -