ETV Bharat / state

भिवंडीमध्ये कुरियर गोदामाची इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

मानकोली नाका परिसरातील हरिहर कंपाऊंडमध्ये असलेल्या गोदामाच्या इमारत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत.

warehouse-building-collapsed-possibility-of-nine-to-ten-laborers-getting-stuck-in-bhiwandi
भिवंडीमध्ये गोदामाची इमारत कोसळली; नऊ ते दहा मजूर अडकल्याची शक्यता
author img

By

Published : Feb 1, 2021, 11:56 AM IST

Updated : Feb 1, 2021, 3:07 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका परिसरातील हरिहर कंपाऊंडमध्ये असलेल्या कुरियर गोदामाच्या इमारत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. भिवंडी गोदाम दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. जखमींवर भिंवडीमधील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौरभ त्रिपाठी या कामगाराचा मृत्यू झाला आहे. सेक्युरिटी गार्ड म्हणून होता गोदामात कामाला होता. तर सुनील कुमार, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केनी आणि शैलेश तरे ही पाच जणांना बाहेर काढले असून ते गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची पथके दाखल झाली असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल -

रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कामाचा दिवस असल्याने या गोदामात व कुरियर कंपनीत कामासाठी मजूर गेले होते. काम सुरु असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली मजूर दबले. आतापर्यंत सहा मजुरांना बाहेर काढण्यात आले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून इमारत पूर्णतः कोसळली असल्याने कामगारांना वाचविण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा - Budget 2021 : जाणून घ्या कसा असेल केंद्रीय अर्थसंकल्प

Last Updated : Feb 1, 2021, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.