ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घोडबंदर परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भित कोसळून २ वाहनांचे नुकसान झाले आहे. घोडबंदर रोडवरील वसंतलीला कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. भिंत कोसळल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पावसामुळे पाणी साठून ही भिंत कोसळल्याचे या व्हिडिओतील दृश्यामध्ये दिसत आहे. भित कोसळल्यानंतर साठलेल्या पाण्याचा प्रवाह इमारतीच्या परिसरात वाहत असल्याचे यामध्ये दिसत आहे. दरम्यान यावेळी वाहनात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.