ठाणे - जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देखील रांगेत उभे राहून मतदान केले.
हेही वाचा -दिवस मतसंग्रामाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सहकुटुंब मतदान
सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. पावसाचा जोरही आता कमी आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावुन मतदान करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा -मुंबईत मतदानाला सुरुवात
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.