नवी मुंबई - नर्सिंग आणि डिप्लोमा कोर्स करणाऱ्या दहा ते बारा मुलींना अशुद्ध पाणी ( Unclean Water ) पिल्याने उलट्या व जुलाब झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पनवेल शहरातील बंदर रोड जवळील वीट नर्सिग सेंटर ( Wit Nursing Center ) येथे घडली आहे. या सर्व मुलींवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ( Wit Nursing Girls Vomiting And Diarrhea ) आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, यातील काही नर्सिंगच्या विद्यार्थीनींची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर काही मुलींवर उपचार सुरू आहेत. अशुद्ध पाणी प्यायल्याने दोन दिवसांपूर्वी अचानक या मुलींना उलट्या, जुलाबचा त्रास सुरु झाला.
त्यानंतर वीट मधील कर्मचाऱ्यांनी लगेच त्यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. मुलींनी पिलेले पाणी तपासाणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहे. नक्की प्रकार काय होता याचा तपास सुरु असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Medical Room Closed : न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना; रेल्वेचा आपत्काली वैद्यकीय कक्ष रात्री बंद !