ETV Bharat / state

एमसीएमध्ये ठाण्याला मिळाले प्रतिनिधीत्व! कमिटी सदस्य म्हणून विहंग सरनाईकांचा विक्रमी विजय - mumbai cricket association latest news

राष्ट्रीय पातळीवर उंच उडी व लांब उडी मधील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विहंग याना खेळाडूंना कोणत्या सुविधा हव्या असतात हे माहित आहे. या निवडणूकीत मुंबई - ठाण्यातील ३५० क्लब व ३९ दिग्गज क्रिकेटपटूंनी मतदान केले. विहंग सरनाईक यांना विक्रमी असे मतदान झाले आहे.

एमसीएमध्ये ठाण्याला मिळाले प्रतिनिधीत्व! कमिटी सदस्य म्हणून विहंग सरनाईक यांचा दणदणीत मतांनी विजय
author img

By

Published : Oct 5, 2019, 8:01 AM IST

ठाणे - 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या (एमसीए) निवडणुकीत मॅनेजिंग कमिटी सदस्य म्हणून ठाण्यातील युवा कार्यकर्ते व माजी नगरसेवक विहंग प्रताप सरनाईक यांची निवड झाली आहे. १६५ मते मिळवून निवडणुकीत विहंग सरनाईक हे विजयी झाल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ठाणे शहर आणि आसपासच्या महानगरात क्रिकेटसाठी चांगले वातावरण तयार करणे तसेच येथून नवीन क्रिकेटपटू तयार व्हावेत म्हणून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विहंग यांनी सांगितले. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा - जडेजाचा मोठा पराक्रम, कसोटीत साकारले सर्वात जलद बळींचे दुहेरी शतक

राष्ट्रीय पातळीवर उंच उडी व लांब उडी मधील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विहंग याना खेळाडूंना कोणत्या सुविधा हव्या असतात हे माहित आहे. या निवडणूकीत मुंबई - ठाण्यातील ३५० क्लब व ३९ दिग्गज क्रिकेटपटूंनी मतदान केले. विहंग सरनाईक यांना विक्रमी असे मतदान झाले आहे.

'मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काम यापुढे ठाण्यात ठळकपणे करणार आहोत. ठाण्यात व आसपासच्या शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी परिपूर्ण असे पोषक वातावरण तयार करणे व त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी मी प्लॅन तयार केला आहे. एमसीएचे काम ठाण्यात अधिक प्रभावीपणे राबविणे हे माझे पाहिले लक्ष्य आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ठाण्यात व आसपासच्या भागात मैदाने उपलब्ध करून देणे, क्रिकेटपटूंना पायाभूत सुविधा देणे असे असा निर्धार मी केला आहे', असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

'आज ठाणे व आसपासच्या परिसरातील मुलांना लोकलने क्रिकेटचा सराव करण्यासाठी मुंबईला जावे लागते, त्यांना त्यांच्या सामानाची जड बॅग घेऊन जावे लागते आणि त्यातच मुलांचा वेळ जातो. भविष्यात सरावासाठीच्या सर्व सुविधा ठाण्यात दिल्यास येथील मुलांचा वेळ वाचेल आणि त्यासाठी ठाण्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देणार आहोत', असेही सरनाईक यांनी सांगितले.

ठाणे महानगर व ठाण्याची उपनगरे असलेली नवीन महानगरे मीरा भाईंदर , अंबरनाथ बदलापूर , उल्हासनगर या भागाला विहंग सरनाईक यांच्या रूपाने प्रतिनिधीत्व मिळाले असल्याने येथील सर्व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता नक्कीच ठाण्यात क्रिकेटसाठी चांगले काही तरी घडेल असा विश्वास लोकांकडून व्यक्त केला जात आहे.

Intro:MCA मध्ये ठाण्याला मिळाले प्रतिनिधीत्व !
कमिटी मेम्बर म्हणून विहंग सरनाईक यांचा दणदणीत मतांनी विजय
खेळाडूंच्या सुविधेसाठी भरीव काम करणार
क्रिकेट अकॅडमी , स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससह अनेक प्रकल्प राबविण्याचा विचारBody:

'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या निवडणुकीत मॅनेजिंग कमिटी मेम्बर म्हणून ठाण्यातील युवा कार्यकर्ते व माजी नगरसेवक विहंग प्रताप सरनाईक यांची आज निवड झाली आहे. १६५ मते मिळवून निवडणुकीत विहंग सरनाईक हे विजयी झाल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला , ठाणे शहराला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ठाण्याचा चेहरा mca मध्ये आता असणार आहे. ठाणे शहर , जिल्हा व आसपासच्या महानगरात क्रिकेटसाठी चांगले वातावरण तयार करणे तसेच येथून नवीन क्रिकेटपटू तयार व्हावेत म्हणून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विहंग यांनी सांगितले. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रीय पातळीवर उंच उडी व लांब उडी मधील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विहंग याना खेळाडूंना काय सोयी सुविधा हव्यात हे चांगले माहित आहे. खेळाडूंमध्ये ते सतत वावरत असतात. त्यामुळे शहरातील खेळाडूना काय सोयी हव्यात , खेळाडूच्या अपेक्षा काय आहेत , एका खेळाडूच्या उज्वल भविष्यासाठी कशा सुविधा असाव्यात याची त्यांना जाणीव आहे, यासाठी त्यांची या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेली निवड फार महत्वाची आहे.
विहंग सरनाईक यांना निवडणुकीत १६५ मते मिळाली आहेत. मुंबई ठाण्यातील ३५० क्लब व ३९ दिग्गज क्रिकेटपटू यांनी मतदान केले. विहंग सरनाईक यांना विक्रमी असे मतदान झाले आहे. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काम यापुढे ठाण्यात ठळकपणे करणार आहोत. ठाण्यात व आसपासच्या शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी परिपूर्ण असे पोषक वातावरण तयार करणे व त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी मी प्लॅन तयार केला आहे. mca चे काम ठाण्यात अधिक प्रभावीपणे राबविणे हे माझे पाहिले लक्ष्य आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ठाण्यात व आसपासच्या भागात
मैदाने उपलब्ध करून देणे , क्रिकेटपटूना पायाभूत सुविधा देणार असा निर्धार त्यांनी केला आहे. नवे क्रिकेटपटू घडावेत म्हणून चांगली मैदाने हवी आहेत.
आज ठाणे व आसपासच्या परिसरातील मुलांना ट्रेन ने क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी मुंबई ला जावे लागते , त्यांना त्यांच्या सामानाची जड बॅग घेऊन जावे लागते व यात मुलांचा वेळ जातो त्यांना मेहनत करावी लागते. यामुळे भविष्यात प्रॅक्टिससाठीच्या सर्व सुविधा ठाण्यात दिल्यास येथील मुलांचा वेळ वाचेल आणि त्यासाठी ठाण्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देणार आहेत असे त्यांनी सांगितले.
क्रिकेटचे तज्ञ प्रशिक्षककडून प्रशिक्षण देण्यात येणार असून
ठाण्यात क्रिकेटचे पूर्ण वातावरण तयार करण्यासाठी ठाण्यात एक क्रीडा संकुल म्हणजेच एक सुसज्ज सेंटर तयार करून तेथे सर्व सुविधा असतील असेही ते म्हणाले. हे सेंटर सुरू झाले की येथील मुले इकडे सर्व सराव करतील
त्यांचा वेळ वाचेल , नवीन क्रिकेटपटू घडतील. सेंटर मुळे त्यांना स्थानिक स्तरावर प्रोत्साहन मिळेल अशा सर्व सोयीसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे विहंग सरनाईक म्हणाले.
भविष्यात या सुविधा झाल्यानंतर ठाण्यातील मुलांचा बाहेर जाण्याचा प्रवासाचा वेळ वाचेल , एनर्जी वाचेल , ठाण्यातच मुलांना सोयी व मूलभूत सुविधा मिळाल्या तर त्यांना त्यांचे लक्ष्य म्हणजेच गोल वर लक्ष केंद्रित करता येईल असे विहंग पुढे म्हणाले.
ठाण्यात मैदाने आणि त्यावर विकेट , चांगले प्रशिक्षक , मैदाने , चांगले टॉयलेट असे सर्व काही असेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी तयार करणार आहोत. ठाणे पालिकेला विनंती करून स्पोर्ट साठी राखीव भूखंडावर bkc च्या धर्तीवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व क्रिकेट क्लब व स्टेडियम तयार करण्याचा संकल्प विहंग सरनाईक यांनी सोडला आहे.

ठाणे महानगर व ठाण्याची उपनगरे असलेली नवीन महानगरे मीरा भाईंदर , अंबरनाथ बदलापूर , उल्हासनगर या भागाला विहंग सरनाईक यांच्या रूपाने प्रतिनिधित्व मिळाले असल्याने येथील सर्व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता नक्कीच ठाण्यात क्रिकेटसाठी चांगले काही तरी घडेल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.