ETV Bharat / state

Sextortion case : आणखी एक सेक्सटॉर्शनचा 'बळी'; 72 वर्षीय जेष्ठ नागरिकाला सव्वा लाखाचा गंडा

एका 72 वर्षीय जेष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत ( senior citizen caught in trap of sextortion) 1 लाख 27 हजाराचा गंडा घालण्यात आला आहे. पैश्यांच्या मागणीला कंटाळून या जेष्ठ नागरिकाने सीबीडी पोलीस ठाण्यात ( CBD Police Station ) तक्रार केली.

Sextortion case
सेक्सटॉर्शन
author img

By

Published : Nov 3, 2022, 9:12 AM IST

Updated : Nov 3, 2022, 9:27 AM IST

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर मधील एका 72 वर्षीय जेष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत ( senior citizen caught in trap of sextortion ) 1 लाख 27 हजाराचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाचा वादग्रस्त व्हिडीओ रेकॉर्डिंग ( Controversial video recording ) करत तो वायरल करण्याची धमकी देत तब्बल सव्वालाखाची रक्कम हडपली. पैसे दिल्यानंतर देखील सायबर ठगांकडून वारंवार होणाऱ्या अधिकच्या पैश्यांच्या मागणीला कंटाळून या जेष्ठ नागरिकाने सीबीडी पोलीस ठाण्यात ( CBD Police Station ) तक्रार केली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी : आठवड्यापूर्वी आलेल्या अज्ञात व्हिडिओ कॉलवर एका महिलेद्वारे जेष्ठ नागरिकाला उत्तेजित करण्यात आले. उत्तेजित जेष्ठ नागरिकाचा व्हिडीओ कॉल स्क्रिन रेकॉर्डच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आला. सदर व्हिडीओ पीडित नागरिकाच्या व्हॉटसऍपवर पाठवत दोन पुरुष सायबर ठगांनी व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची फोनद्वारे धमकी दिली. बदनामी नको असेल तर पैसे द्या अन्यथा बदनामीला सामोरे जा या धमकीला घाबरत पीडित नागरिकाने ठगांना तीन वेळा एकूण 1 लाख 27 हजार रु. पाठवले. मात्र पैशांची मागणी सुरूच राहिल्याने या नागरिकाने सीबीडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हाय प्रोफाईल, राजकीय, उच्च अधिकारी, तरुण यांच्यावर होणारे सेक्सटॉर्शनचे लोन आता जेष्ठ नागरिकांपर्यंत पसरल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.

भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधुन गुन्हा दाखल करावा

सेक्स टॉर्शनचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला : सेक्स टॉर्शनचा प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोठमोठ्या लोकांना याचा फटका बसला आहे. या प्रकरणात बदनामी होण्याच्या भीतीचे कित्येकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. सध्या या सेक्स टॉर्शनचे जाळे सोशल मिडियाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागापर्यंत देखील पोहचल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत.

नक्की प्रकार काय आहे, कसे होते सेक्सटॉर्शन ? अनेकांच्या थेट व्हाट्सअपवर अचानकपणे सुंदर मुलीचा प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी क्रमांकावरून मेसेज येतो. त्याला प्रतिसाद दिला की, गोड बोलून त्याच्याकडून अधिक माहिती काढून घेतली जाते. वारंवार संवाद साधल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. संवाद सुरू झाल्यानंतर शारीरिक संदर्भातील व्हिडिओ संवाद सुरू होतो. आणि याचाच फायदा घेऊन स्क्रीन रेकॉर्ड केले जाते. इथूनच खेळ सुरू होतो पैसे देवाण-घेवाणीचा. जर मला अमुक-तमुक रक्कम नाही दिली तर मी तुझे हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनामी करण्याची धमकी दिली जाते. अन् मग सुरुवात होते मानसिक छळ, खंडणीची मागणी आणि ब्लॅकमेलिंगची. यातून पुढे गंभीर गुन्हेही घडत जातात. या ट्रॅपची मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हॉट्सअपवर होताना दिसत आहे. तरुण या मोहजाळ्यात अडकून बदनामी वाचवण्यासाठी पैसे देतात. जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर तरुण आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय निवडत नाहीत. त्यामुळे सोशल मिडिया वापरकर्त्यांना या धोक्याची पूर्वकल्पना असणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत असुन, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी बोलताना कोणत्याही मोहात न अडकता योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा तुम्ही देखील सेक्स टॉर्शनच्या जाळ्यात अडकु शकता. नकळतपणे अशा ट्रॅपच्या विळख्यात सापडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

सेक्स टॉर्शन म्हणजे काय ? सेक्स टॉर्शन म्हणजे मोहात पाडू शकणार्‍या किंवा आकर्षक व्यक्तीचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे. तसेच विविध कारणांसाठी त्याला ब्लॅकमेल करून त्याचा वापर करून घेणे.फोटो घेऊनही केले जाते ब्लॅकमेलिंग. कोणत्याही कारणाने तुमचे सेल्फी मागवले जातात, समोरूनही फोटो पाठवले जातात. अचानक एखाद्या न्यूड फोटोवर यूजरचा चेहरा दिसतो अन् यूजरला घाम फुटताे. या फोटोवरून ब्लॅकमेलिंग सुरू होते, परंतु यूजर काहीही करू शकत नाही. फेसबुक, इंस्टाग्रामसह व्हाट्सअपवर वाढले प्रमाण अधिक- फेसबुक इंस्टाग्रामवर एखाद्या सुंदर मुलीचा फोटो डिपी ठेवला जातो. त्या माध्यमातून तरुणांना रिक्वेस्ट टाकली जाते. रिक्वेस्ट आल्यानंतर तरुणांना मेसेज केला जातो. याच डीपीला बघून तरुण आकर्षित होतो. संवाद सुरू केल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. येथेच तरुण जाळ्यात अडकून पडतो. हा सर्व प्रकार फेसबुक, इंस्टाग्राम व्हायचा तर आता अलिकडे थेट व्हाट्सअपवर देखील सुरू झाला आहे.

आपण लैंगिक शोषणाला बळी पडल्यास काय करावे ? घाबरु नका, लक्षात ठेवा की ही तुमची चूक नाही आणि तुम्ही एकटे नाही. तुमचा विश्वास असलेल्या एखाद्या व्यक्तीला सांगा जेणेकरुन ते तुम्हाला मदत मिळवण्यात मदत करु शकतील. गुन्हेगाराशी संवाद साधणे थांबवा. पैसे किंवा अधिक घनिष्ठ सामग्री पाठवून त्यांच्या धमक्यांना बळी पडू नका. त्यांच्या ब्लॅकमेल आणि धमक्यांचा पुरावा तुमच्या डिव्हाइसवर ठेवा.

भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधुन गुन्हा दाखल करावा : आताच्या जमान्यात कोण कसा 'ट्रॅप' लावेल सांगता येत नाही. त्यामुळंच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडं चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका. अनोळखी कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. नकळतपणे तुम्ही यामध्ये अडकला असाल तर घाबरून जाऊ नका. बदनामी भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधुन गुन्हा दाखल करावा जेणेकरून पोलिसांना तपास करून कारवाई करता येईल. संबंधित तक्रारदारचे नाव गोपीनय ठेवले जाईल. सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करावा. अशा सूचना नवी मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 च्या विवेक पानसरेंनी दिल्या आहेत.

Last Updated : Nov 3, 2022, 9:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.