ETV Bharat / state

Corona: अनावश्यक गर्दी टाळा...  ठाण्यात भाजीपाला बाजाराचे होणार विकेंद्रीकरण - thane

शहरात एकाच ठिकाणी भाजीपाला बाजार भरतो त्याऐवजी तो शहरातील प्रभागानुसार किंवा दोन प्रभागासाठी एका ठिकाणी भरवावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

vegetable markets will decentralize said by thane collector
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
author img

By

Published : Apr 15, 2020, 9:06 AM IST

ठाणे- जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई, भाजीपाला बाजार, फळबाजार व सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. ती बंदी १५ एप्रिलपासून संपुष्टात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण व्यवस्था (Supply Chain) आणि भाजीपाला बाजार, फळबाजार व सर्व फळे बाजार सुरळीत राहील यासाठी प्रत्येक महानगरपालिका ,नगरपालिका,नगरपंचायत यांनी त्यांचे स्तरावर एक नोडल अधिकारी नेमावा. या नोडल अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनानुसार व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही करावी.

  1. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी मास्क वापरणे व सुरक्षित अंतराचे नियम पाळणे तसेच या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात यावे. सदर ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश उपलब्ध ठेवावे.
  2. जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवणेसाठी आढावा घेवून नियोजन करावे. जीवनावश्यक वस्तूंबाबत साठेबाजी किंवा वाढीव दराने विक्री होणार नाही याबाबत वेळोवेळी खात्री करण्यात यावी.
  3. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत भाजी विक्रेत्यांची नियमित तपासणी करणेत यावी.
  4. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसा पोलीस बंदोबस्त व सुरक्षा ठेवणेत यावी.

भाजीपाला बाजार , फळबाजार व सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने पुरवठा व वितरण सुरळीतपणे होण्यासाठी सर्व महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कृषि उत्पन्न बाजार समिती यांचे संबंधित अधिकारी, कर्मचारी व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात सुचनांची काटेकोरपणे व प्राध्यान्याने अंमलबजावणी करावी. नागरिक गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुध्द भारतीय साथरोग अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहितेचे कलम, 188 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निर्देशांची अंमलबजावणी सर्व संबंधितांनी काटेकोरपणे करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.