ETV Bharat / state

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या वंदना पाटील यांची निवड

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या वंदना मंगेश पाटील यांची तर उपसभापतीपदी सुनिता शशिकांत भोईर यांची निवड झाली आहे. तर परिवहन समितीच्या सभापतीपदी भाजपचे दिलीप रूपचंद जैन यांची निवड झाल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांनी जाहीर केले आहे.

author img

By

Published : Jan 20, 2021, 6:18 PM IST

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या वंदना पाटील

मीरा भाईंदर(ठाणे)- मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या वंदना मंगेश पाटील यांची तर उपसभापतीपदी सुनिता शशिकांत भोईर यांची निवड झाली आहे. तर परिवहन समितीच्या सभापतीपदी भाजपचे दिलीप रूपचंद जैन यांची निवड झाल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांनी जाहीर केले आहे.

भाजपची एकहाती सत्ता

महिला बालकल्याण व परिवहन समितीच्या सभापती पदाकरता मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आज निवडणूक घेण्यात आली. भाजपाच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती पदाकरता वंदना मंगेश पाटील तर उपसभापती पदाकरता सुनिता शशिकांत भोईर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर परिवहन समिती सभापती पदाकरीता भाजप नगरसेवक दिलीप रूपचंद जैन यांनी अर्ज दाखल केलेला होता.महिला बालकल्याण समिती सभापती पदाकरीता शिवसेनेच्या तारा विनायक घरत आणि उपसभापती पदाकरीता मर्लिन डिसा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर परिवहन समिती सभापती पदाकरीता शिवसेनेचे राजेश हरिश्चंद्र म्हात्रे यांनी अर्ज दाखल केलेला होता.

महापौरांनी केले विजयी उमेदवारांचे स्वागत

या निवडणूकीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील राजकीय पक्षांचे तौलानिक संख्याबळ पाहता परिवहन समितीच्या सभापतीपदी दिलीप जैन तर महिल्या बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वंदना मंगेश पाटील आणि उपसभापतीपदी सुनिता भोईर यांची निवड झाली आहे. यानंतर महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गहलोत, स्थायी समिती सभापती अशोक तिवारी आणि सभागृह नेता प्रशांत दळवी यांनी विजेत्या उमेदवारांचे स्वागत केले.

महिलांसाठी काम करणार

माझ्यावर भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दाखवला आहे तो मी प्रामाणिकपणे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल. शहरातील गोर गरजू महिलांसाठी माझ्या समिती मार्फत चांगल्या योजना राबवणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित महिला व बालकल्याण सभापती वंदना पाटील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.