ठाणे : मुसळधार पावसाने उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. दोन दिवसांत तब्बल 315 मिलिमीटर पाऊस पडल्याने तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील बऱ्याच तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे. येऊरच्या पायथ्याशी असणारा निसर्गरम्य असा उपवन तलाव काठोकाठ भरून पाणी तळ्याच्या बाहेर लागले येऊ लागले आहे. तर ठाणे महापालिका प्रशासनाने तलावाच्या आसपास जाण्यास मनाई केली आहे.
![Heavy Rains In Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-07-2023/19049689_t2.jpg)
उपवन तलाव ओव्हरफ्लो : दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. ठाण्यामध्ये काही सखल भागामध्ये पाणी साचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्रसिद्ध उपवन तलाव हा ओव्हरफ्लो झाला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमधून डोंगरातून पाणी हे उपवन तलावमध्ये जमा होते. त्यामुळे उपवन तलाव हा लवकर भरतो. या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला. तर शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी हे पावसाचा आनंद घेत आहेत. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
![Upvan lake Overflows A](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-07-2023/19049689_t3.jpg)
या तलावात पाणी फुल्ल : गेले दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच ठाण्यातील मासुंदा तलाव, कचराली तलाव, दातीवली तलाव, मुंब्रा तलाव, कोळीवाडा तलाव, मखमली तलाव हे ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच कालच प्रशासनातर्फे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. परंतु शाळकरी विद्यार्थी मात्र पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले आहेत, असे हे चित्र आज अनेक ठिकाणी दिसून आले. मात्र प्रशासनाने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पर्यटन करताना विशेषतः सेल्फी काढण्याच्या नादात काही धोका होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
![Upvan lake In Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-07-2023/19049689_t4.jpg)
हेही वाचा -
- School Closed News : मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये बारावीपर्यंत शाळांना सुट्टी, जाणून घ्या शिक्षण विभागाचे आदेश
- Heavy Rainfall In Thane : पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी शिनगारे यांची माहिती
- Maharashtra Rain Updates : कोकणात पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफडून राज्यात एकूण 12 टीम तैनात