ठाणे - कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात असलेल्या स्मशानभूमीची संरक्षण भींत पाडून या ठिकाणी लहान मुलांच्या दफन विधीच्या जागेतच सर्वजनिक सौचालय एका ठेकेदारामार्फत उभारण्यात आले. या गंभीर विषया कल्याण पूर्वतील आम आदमी पार्टीच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना १० दिवसात भितींचे काम करून हिंदूच्या भावनेचा आदर करावा जर १० दिवसात संरक्षण भिंत उभारली नाही तर आम आदमी आपल्या खर्चाने ही भिंत उभारणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर आम आदमीच्या कार्यकत्यांनी स्वखर्चाने या भिंतीचे काम आजपासून सुरु केले. त्यामुळे दफनभूमीतील दुरुस्तीच्या कामात महापालिकेचा अक्षम हलगर्जीपणा समोर आला आहे.
महापालिकेने लावला अजब सूचनेचा फकल -
स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशदारावरच कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून अजब सूचनेचा फकल लावून त्यावर स्मशानभूमीचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जर या ठिकाणी दफनविधी करायचा असेल तर नातेवाईकांनी आपल्या जबाबदारीवर करावा असा उल्लेख असलेला फकल लावल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पालिका विरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहे.
संरक्षण भिंत नसल्याने दफनभूमीत भटके कुत्रे, जनावरांचा वावर -
दोन महिने होऊन सुद्धा ती संरक्षण भिंत महापालिके उभारली नसल्याने या ठिकाणी मृत लहान बालकांचे दफनविधी होत आहेत. विशेष म्हणजे संरक्षण भिंत नसल्याने या दफनभूमीत भटके कुत्रे ,जनावरे आतमध्ये घुसुन या दफन भूमीतील मृत बालकांच्या मृतदेहाची विटंबना होऊ शकते, असे आम आदमी पार्टीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, महापालिकेने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून दफनभूमीतील दुरुस्तीच्या कामात महापालिकेचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष एड, धनंजय जोगदंड यांनी केला आहे.