ETV Bharat / state

Minister Kapil Patil : केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, वक्त पर जागे नही तो, तिरंगे मे चांद दिखाई देगा - Minister kapil patil

देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य बालाजी दरबार प्रथमच भिवंडीत 6 नोव्हेंबर व 7 नोव्हेंबर आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील ( Kapil Patil union State Minister  ) यांनी सुद्धा आज त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी बागेश्वर धाम सरकार यांचे स्तुती करीत असताना कार्यक्रमांमध्ये महाराज या माध्यमातून आपल्याला जागे करण्यासाठी आले आहेत. या दरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 7, 2022, 10:31 PM IST

ठाणे : देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य बालाजी दरबार प्रथमच भिवंडीत 6 नोव्हेंबर व 7 नोव्हेंबर आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील ( Kapil Patil union State Minister ) यांनी सुद्धा आज त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी बागेश्वर धाम सरकार यांचे स्तुती करीत असताना कार्यक्रमांमध्ये महाराज या माध्यमातून आपल्याला जागे करण्यासाठी आले आहेत. या दरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील बोलताना

मंत्री पाटील काय म्हणाले - ‘वेळेवर आपण जर जागे झालो तर ठीक, नाहीतर ती वेळ लांब नाही की तिरंग्यावर चंद्र दिसेल’ ( वक्त पर जागे नही तो तिरंगे मे चांद दिखाई देगा) असे वादग्रस्त वक्तव्य महाराजांच्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील ( Union Minister Kapil Patil ) यांनी हे वक्तव्य केले आहे.

कार्यक्रमाची पार्श्वभूमी - दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतपीठाच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून नागरिकांचे दुःख व समस्या निवारण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. सध्याचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून 8 वर्षांपासून हजारो नागरिकांशी संवाद साधण्यात येतो.यासाठी महाराष्ट्रतून व देशातून लाखोच्या संख्येने भाविक भिवंडीत दाखल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.