ETV Bharat / state

Kapil Patil on Bullock Cart : शेतकऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बैलगाडा शर्यतींचा थरार; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

शेतकऱ्यांच्या मनातील इच्छा मोंदींनी पूर्ण करण्यासाठी आज हजरोंच्या संख्येनं बैलगाडा शर्यतीची आयोजन करण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रसरमाध्यमांशी बोलताना सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत भिवंडी तालुक्यातील ईताडे गावात भव्य छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन रविवारी सकाळी ९ ते ५ या कालावधीत करण्यात आले.

Kapil Patil on Bullock Cart
बैलगाडा शर्यत ठाणे
author img

By

Published : Mar 12, 2023, 10:51 PM IST

ठाणे : शेतकऱ्यांचा पारंपरिक असलेला बैलगाडा शर्यतीचा खेळ आठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हा खेळ पुन्हा सुरु करावा म्हणून तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सूचना देऊन सुप्रीम कोर्टात बाजू मांडत बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील इच्छा मोंदींनी पूर्ण करण्यासाठी आज हजरोंच्या संख्येनं बैलगाडा शर्यतीची आयोजन करण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रसरमाध्यमांशी बोलताना सांगितले.

छखड्यांच्या जंगी शर्यतींचा थरार : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत भिवंडी तालुक्यातील ईताडे गावात भव्य छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन रविवारी सकाळी ९ ते ५ या कालावधीत करण्यात आले. भिवंडीतील जय मोनशेरा प्रसन्न ईताडे या ठिकाणी बैलगाडा शर्यत प्रेमींना छखड्यांच्या जंगी शर्यतींचा थरार अनुभवायला आला.

केंद्रीय राज्यमंत्री मैदानात : छखड्यांच्या बैलगाडा शर्यतीमध्ये आज १५ जिल्ह्यातून सुमारे तीन हजारांच्यावर बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला आहे. ठाण्यातील या शर्यतीमध्ये कोट्यवधींची उलाढाल एकच दिवशी झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. विशेष म्हणजे छखड्यांच्या बैलगाडा शर्यतीच्या घटनास्थळी येताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे चक्क छखड्यांच्या बैलगाडाची दोरी हातात धरून त्यांनीही बैलगाडा शर्यतीचा आनंद अनुभवल्याने शर्यतीच्या ठिकाणी असलेल्या हाजरोच्या जमावासह ढोल ताश्याच्या गजरात त्यांचे स्वागत कऱण्यात आले.

बोकडांसह लाखोंची बक्षिसांची लयलूट : या शर्यतींमध्ये १ गोंडयावरती शर्यत जिंकणाऱ्या बैलजोडी साठी लकी ड्रॉ द्वारे ५ चिठ्ठया काढून १ बाईक, टीव्ही, फ्रीज, कुलर,सायकल आदी बक्षिसे देण्यात आली .तर २ गोंडयावरती शर्यत जिकणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ द्वारे ३ चिठ्ठया काढून ३ बाईक देण्यात आल्या.तसेच कोणीही दोन गोंडयावर तेच दोन बैल ठेवून पहिली हॅट्रिक मारेल त्या जोडीसाठी एक बाईक बक्षीस स्वरूपात देण्यात आली. त्याचप्रमाणे २ गोंडयावर जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांना एक बोकड बक्षीस म्हणून दिले गेले.

मोठ्या संख्येत उपस्थिती : शिवाय या छखड्यांच्या शर्यतींमध्ये प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉ द्वारे बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. प्रेक्षकांना लकी ड्रॉ मधील प्रथम क्रमांकासाठी ३ तोळ्यांची चैन,द्वितीय २ तोळे सोन्याची चैन तर तृतीय क्रमांकासाठी १ तोळ्यांची सोन्याची चैन देण्यात आली .आणि हा लकी ड्रॉ मोफत असून यासाठी प्रेक्षकांनी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आधार कार्डसहीत नाव नोंदणी करणे अनिवार्य केल्याने हजरोच्या संख्यने जमवा जमला होता.

हेही वाचा : BMC News : मुंबईत काम करणाऱ्या महिलांसाठी पालिकेने घेतला 'हा' निर्णय, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.