ETV Bharat / state

Two Youth Downed Thane : ठाण्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू - पोहायला गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू

फायरिंग रेंज ग्राउंड येथे पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला ( Two Youth Downed Thane ) आहे. ऑनलाईन शाळेचा कंटाला आल्याने हे दोघे पोहायला गेले होते. मात्र, पाण्याच अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Two Youth Downed Thane
Two Youth Downed Thane
author img

By

Published : Jan 23, 2022, 1:37 AM IST

ठाणे - ठाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ( Two Youth Downed Thane ) आहे. ऑनलाईन शाळा सुरु असल्याने त्रासून गेलेले दोन मित्र फायरिंग रेंज ग्राउंड जवळ, रामबाग, उपवन, ठाणे (प.) येथे गेले असता ही घटना घडली आहे. तर, सव्वा महिन्यात चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने, ठाण्यातील बिनकामाची डबकी ही आता मृत्यूचा सापळा बनली आहेत.

गौतम वाल्मिकी (१२) आणि निर्भय चोहान (१५) असे या मृत मुलांची नावे आहेत. गौतम वाल्मिकी हा शास्त्री नगरमध्ये परिवारासह राहतो. तर निर्भय हा उत्तरप्रदेशात राहत असून तो गौतमचा पाहुणा असल्याने दोन दिवसांपूर्वीच आला होता. गौतम आणि निर्भय यांनी शनिवारी ३-३० वाजण्याचं सुमारास फायरिंग रेंज ग्राउंड जवळ, रामबाग, उपवन, ठाणे (प.) येथे पोहण्यासाठी गेले. डबक्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची खबर मिळताच घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, वर्तक नगर पोलीस आणि ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी दोघा मुलांनाच शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

सव्वा महिन्यात दुसरी घटना

फायरिंग रेंज ग्राउंड जवळ, रामबाग, उपवन, ठाणे (प.) येथील खड्डा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. याच खड्ड्यात ११ वर्षीय अभिषेक बबलु शर्मा आणि त्याचा मित्र कृष्णा मनोज गौड (११) रा. कृष्णाचाळ, रामबाग , उपवन, ठाणे (प.) या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यांनतर आता सव्वा महिन्यातच गौतम वाल्मिकी निर्भय चोहान यांचाही बुडून मृत्यू झाल्याने मुळात हा खड्डाच कशासाठी तयार करण्यात आला आहे, असा सवाल आता स्थानिक संतप्त नागरिक करीत आहेत.

हेही वाचा- Navneet Rana Audio Clip : नवनीत राणांच्या त्या ऑडिओ क्लिपबाबत महिला आयोगाने मागीतला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.