ठाणे - येथील तीन हात नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी आज दोन युवकांच्या जीवावर बेतलेली आहे. गर्दीच्या वेळेस वाहतूक कोंडी असताना तीन हात नाका पुलावर अॅक्टिवा या दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
दरम्यान, वाहतूक पोलीस घटनास्थळी वाहतूक नियोजनाचा काम करीत आहेत. घटनास्थळावरून दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दोघांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न ठाणे पोलीस करत आहेत. या अपघाताला कारणीभूत असलेल्या गुजरातमधील ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा -राजमुद्रेला आक्षेप नोंदवणाऱ्यांना चर्चेसाठी मनसेचे दरवाजे खुले - बाळा नांदगावकर