ETV Bharat / state

लग्नासाठी व्याजाने कर्ज घेऊन पिळवणूक होणारे दोन तरुण वेठबिगारीतून मुक्त - भिवंडी गुन्हे बातमी

दोन तरुणांना लग्नासाठी व्याजाने कर्ज देऊन दोन वर्षे त्यांच्याकडून विविध कामे करुन घेत त्यांची शारीरिक व आर्थीक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी एका सावकाराविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

thane
thane
author img

By

Published : Jul 29, 2020, 3:50 PM IST

ठाणे - दोन आदिवासी तरुणांना लग्नासाठी व्याजाने कर्ज देऊन एकाने त्याच्या सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन)अधिनियम १९७६ च्या कलम १५, १६, १७, १८ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८९ कलम ३ (१) (एच ) व ६ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. निलेश तांगडी, असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. तर राजेश भोईर (वय २४ वर्षे) व भिमा भोईर ( वय २२ वर्षे ) असे सावकाराच्या जाचातून सुटका झालेल्या दोन भावांची नावे असून ते भिवंडी तालुक्यातील पाये, नाईकपाडा येथे राहणारे आहेत.

पीडित तरुणांचे २९ मे, २०१८ रोजी लग्न झाले होते. या सोहळ्यासाठी आरोपी सावकार निलेश तांगडीने १ लाख १९ हजार ६९० रुपये खर्च केला होता. त्यावेळी तो खर्च त्याने एका कागदावर लिहून दिले होते. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनी दोघा भावांनी आरोपी निलेश तांगडी यांच्या मालकीच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये महिना वेतन देण्याचे निश्चित करून आठवड्याला प्रत्येकी १ हजार रुपये दोघांना देण्याचे ठरवण्यात आले होते. तर दोघा भावांना घरी येण्या-जाण्यासाठी एक दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्तेही दर महिन्याला दोघांच्या पगारातून कपात केले जायचे.

विशेष म्हणजे कागदावर लग्नाचा खर्च लिहून दिल्यापासून दोन वर्षात आजपर्यंत दोघांचा हिशेब केलेला नव्हता. सर्व्हिस सेंटरवर काम नसले की, आरोपी निलेश तांगडी हा त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा. सध्या कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. यावेळी आरोपी निलेश तांगडीने दोघा भावांना फोनवरून तसेच घरी येऊन आवणीच्या कामाला चला, असा तगादा लावला होता. त्यावेळी घरच्या आवणीचे काम आटोपून आम्ही कामावर येतो, असे सांगितले. मात्र, निलेश हा काही ऐकत नव्हता. त्यामुळे दोघा भावांनी निलेश यास दोन वर्षे काम केल्याचा हिशोब करण्यास सांगितले. याचा राग मनात ठेवून निलेश तांगडीने दोघा भावांना शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच माझे व्याजासहीत ३ लाख रुपये तुमच्या अंगावर झाले आहेत. ते एका महिन्यात मला परत द्या, असे धमकावले. यामुळे राजेश व भिमा यांचे कुटुंब घाबरून अस्वस्थ झाले होते. अखेर या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांची भेट घेऊन सर्व घटनाक्रम सांगितला. पिडीत तरुणांच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन बाळाराम भोईर यांनी भिवंडी तालुक्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन रात्री उशिरा वेठबिगार मुक्ती व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये पोलिसांत तक्रार दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना दिली असता त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पीडित राजेश व भीमा भोईर या दोघा भावांना कार्यालयात बोलावून घत त्यांना वेठबिगार मुक्तीचे दाखले देऊन बंध मुक्त केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास गणेशपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.