ETV Bharat / state

ठाण्यात लोकलमधील गर्दीचे दोन बळी - कोपर-ठाकुर्ली स्थानक

ठाण्यात गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून एका विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू झाला. जयेश विठ्ठल कुडव (वय-19, विद्यार्थी) आणि संतोष किर्ती कोहली (वय-27, वेटर) अशी मृतांची नावे आहेत.

मृत विद्यार्थी जयेश विठ्ठल कुडव
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:00 PM IST

ठाणे - कोपर-ठाकुर्ली स्थानकाजवळ गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून एका विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना लागोपाठ घडल्या. जयेश विठ्ठल कुडव (वय-19, विद्यार्थी) आणि संतोष किर्ती कोहली (वय-27, वेटर) अशी मृतांची नावे आहेत.

ठाण्यात गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून एका विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू

मृत जयेश याने ठाण्यातून आसनगाकडे जाणारी लोकल पकडली. यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कोपर स्थानकाजवळ तोल जाऊन तो लोकलबाहेर फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेश हा शहापूर तालुक्यातील मुसई (शेणवे) गावचा रहिवासी आहे. तो दिवा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

हेही वाचा - प्रेम प्रकरणात आडवा येणाऱ्याचा चिरला गळा, प्रियकरासह तिघांना अटक

दुसऱ्या घटनेत ऐरोली येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या संतोष कोहली याचा मृत्यू झाला. संतोष मंगळवारी उल्हासनगरला आईला भेटण्यासाठी गेला होता. तेथून तो फास्ट लोकलने ठाण्याकडे येत होता. ठाकुर्ली स्थानकासमोर संतोष लोकलबाहेर फेकला गेला. यात जबर जखमी झालेल्या संतोषचा मृत्यू झाला.

Intro:Body:लोकल गर्दीचे लागोपाठ 2 बळी; विद्यार्थ्यासह वेटरचा धावत्या लोकलमधील गर्दीच्या रेट्यात खाली पडून मृत्यू

ठाणे :- कोपर आणि ठाकुर्ली स्थानकानजीक गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून एका विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू झाल्याच्या लागोपाठ 2 घटना घडल्या. जयेश विठ्ठल कुडव (19) आणि संतोष किर्ती कोहली (27) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. लोकलमधील वाढत्या गर्दीचे हे दोन्ही बळी ठरले आहेत.
मृतक जयेश याने ठाण्यातून आसनगाकडे जाणारी लोकल पकडली. यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कोपर स्थानका दरम्यानच तोल जाऊन तो लोकलबाहेर फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेश हा शहापूर तालुक्यातील मुसई (शेणवे) गावचा रहिवासी आहे. तो दिवा येथिल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. शहापूरहून आसनगावला येऊन तो लोकलने दिवा स्टेशनवर उतरत असे. संध्याकाळी 5 वाजता सुटल्यानंतर तो ठाण्यातील सक्सेस क्लासेसमध्ये जात असे. तेथून रात्री 8.30 वाजता ठाण्यातून आसनगावकडे जाणारी लोकल पकडत असे. नेहमीप्रमाणे रात्री तो ठाण्यातून फास्ट लोकलने आसनगावकडे निघाला. मात्र कोपर स्थानकानजीक गर्दीच्या रेट्यामुळे लोकलबाहेर फेकला गेला. जयेश हा लोकलखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीनंतर जयेशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला. जयेशच्या पश्चात आई-वडील, 2 भाऊ असा परिवार आहे.
तर दुसरी घटना ठाकुर्ली स्थानकासमोर बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. उल्हासनगर 3 येथिल राधिका महलमध्ये राहणारा संतोष कोहली हा नवी मुंबईतील ऐरोली येथे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मंगळवारी उल्हासनगरला आईला भेटण्यासाठी गेला होता. तेथून तो बुधवारी सकाळी फास्ट लोकलने ठाण्याकडे येत होता. ठाकुर्ली स्थानकासमोर संतोष लोकलबाहेर फेकला गेला. यात जबर जखमी झालेल्या संतोषचा मृत्यू झाला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून अधिक तपास सुरु केला आहे.

फोटो : जयेश विठ्ठल कुडव
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.