ठाणे : अनेक ठिकाणी धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. तर धबधब्याच्या कुंडात दोन मित्राचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील खोर गावच्या हद्दीत असलेल्या कुंडात घडली आहे. मात्र त्याच्यासोबत असलेली मैत्रीण बचावली असल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कार्तिक नागभूषण रेड्डी - पाटील (वय, २२, रा. आंध्रप्रदेश ) धनंजय दत्तात्रये गायकवाड ( वय ३०, रा. मुरबाड) असे दोन्ही मृतक मित्राची नावे आहेत.
तोल जाऊन पाण्याचा कुंडात पडले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक कार्तिक आणि धनंजय हे दोघे आज ( मंगळवार) सायंकाळच्या सुमारास कल्याण तालुकयातील कोलम गावात राहणाऱ्या २२ वर्षीय मैत्रिणी सोबत सहलीसाठी आले होते. त्यावेळी शहापूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील माऊली गडाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या कुंडाजवळ आले होते. त्याच वेळी मृतक कार्तिक याचा तोल जाऊन तो पाण्याचा कुंडात पडला होता. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी धनंजयनेही कुंडात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रत्यन केला. मात्र दोघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिली आहे.
दोघांचे मृतदेह कुंडातून बाहेर काढले : दोघांसोबत आलेली मैत्रीण नजीकच्या खोर गावात जाऊन घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी वाशिंद पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देऊन परिसरात असलेल्या बचाव पथकाला माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. मात्र सायंकाळच्या अंधार होण्यापूर्वी बचाव पथकातील प्रदीप गायकर, अमित तावडे, गजाजन शिंगेळे, ज्ञानेशवर कामोठे या पथकाने दोघांचे मृतदेह कुंडातून बाहेर काढले. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. या घटनेची नोंद वाशिंद पोलीस ठाण्यात केली असून, पुढील तपास सुरू केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Exclusive : धबधब्यावरून कोसळलेल्या आयटी इंजिनियरच्या शोधासाठी 'ड्रोन'ची मदत; ७ दिवसांनी मृतदेह लागला हाती
- Youth Fall In Kund While Taking Selfie: सेल्फी घेताना तरुण 70 फूट कुंडात कोसळला, बचाव कार्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
- Coutralam Falls जुन्या कुरळा धबधब्यात वाहून गेलेल्या मुलाला तरुणाने वाचवले पहा व्हिडिओ