ठाणे - पावसाळा सुरु होताच शेती आणि जंगलांतील सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे व भक्ष्य शोधण्यासाठी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना घडल्या आहे. कल्याण पश्चिम परिसरात गोळ्वली गावात दोन कोब्रा आढळून आले आहेत. एक कोंबड्याच्या पोल्ट्रीफार्ममध्ये तर दुसरा चायनीज सेंटरच्या कपाटात आढळून आला आहे.
कोंबड्याना भक्ष्य करण्यासाठी कोब्रा नाग पिंजऱ्यात
कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच कल्याण पश्चिम परिसरात गोळ्वली गावात वामन भंडारी राहतात. त्यांच्या घरासमोरच एका शेडमध्ये कुकटपालन करून त्या कोंबड्याना एका पिंजऱ्यात ठेवले आहे. मात्र काल सकाळच्या सुमारास अचानक वामन याला कोंबड्यांच्या पिंजऱ्यावर कोब्रा नाग दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोब्रा नाग पिंजऱ्याच्या खाली जाऊन बसला. त्यांनतर त्यांनी कोंबड्यांच्या पिंजऱ्यात नाग असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. बोबे घटनास्थळी पोहचून शिताफीने या कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने भंडारी कुटूंबानी सुटकेचा निश्वास घेतला.
चायनीज सेंटरच्या कपाटात कोब्रा नाग
दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिम आधारवाडी परिसरात राहणारा अभिजित याच्या घराच्या समोरच चायनीज सेंटर आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद ठेवण्यात आला होता. त्यातच काल सायंकाळच्या सुमारास लांबलचक कोब्रा नाग तिथल्या कपाटात शिरला. अभिजित कपाटाजवळ गेला असता त्याला हा नाग कपाटात दडून बसल्याचे आढळून आले. त्याने कपाटात नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता काही वेळातच घटनास्थळी येऊन या कोब्रा नागाला शिताफीने पकडले.
निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान
या दोन विषारी कोब्रा सापाला वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेऊन जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरतात. यापुढे कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे अहवान दत्ता यांनी केले आहे.