ETV Bharat / state

मासे पकडणे बेतले जीवावर..! सख्ख्ये भाऊ नदी पात्रात बुडाले, एकाचा मृत्यू

author img

By

Published : Aug 30, 2020, 10:11 AM IST

ही घटना भिवंडीतील चाविन्द्रा पेट्रोल पंपामागे असलेल्या कामवारी नदी पात्रात घडली. शाहबाज अन्सारी (वय 24) शाहआलम अन्सारी (वय 22) अशी नदी पात्रात बुडालेल्या दोघा भावांची नावे आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठाणे
ठाणे

ठाणे - गळ टाकून नदीतील मासे पकडण्यासाठी काठावर बसलेल्या एकाचा पाय घसरून तो नदीत पडून बुडाला. त्याचा भाऊ त्याला वाचविण्यासाठी गेला असता, तोही नदीत पात्रात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील चाविन्द्रा पेट्रोल पंपामागे असलेल्या कामवारी नदी पात्रात घडली. शाहबाज अन्सारी (वय 24) शाहआलम अन्सारी (वय 22) अशी नदी पात्रात बुडालेल्या दोघा भावांची नावे आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे या दोघा भावांसोबत त्यांची आई देखील घटनास्थळी उपस्थित होती. आपल्या दोन्ही मुलांना पाण्यात बुडताना पाहून मदतीसाठी ती रस्त्याने धावत सुटली मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले.

नदी
नदी

मिळालेल्या माहितीनुसार मृत शाहबाज आणि शाहआलम हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह मुंबई येथून नुकतेच भिवंडी शहरातील मिल्लतनगर येथील 'रव्हेरा प्लाम्स' सदनिकेमध्ये राहायला आले होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हे दोघे कामवारी नदीत चाविन्द्रा पेट्रोल पंपामागे आपल्या आईसोबत मासे पकडण्यासाठी गेले होते. गळ टाकून मासे पकडण्यासाठी नदी काठावर उभ्या असलेल्या एका भावाचा पाय घसरून तो नदीच्या प्रवाहात वाहत जाऊ लागला. त्याला बुडताना पाहून दुसऱ्या भावाने आईजवळील ओढणी घेऊन बुडणाऱ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तोही बुडू लागला. दोन्ही मुलांना बुडताना पाहून आईने रस्त्याच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. ही माहिती मिल्लतनगर भागात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर स्थानिक नगरसेवक इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास पाचारण केले.

हेही वाचा - बनावट जात प्रमाणपत्र : भाजप नगरसेविका नीला सोन्स यांच्या प्रकरणाला वेगळं वळण

दरम्यान, स्थानिक तरुणांनी नदीच्या प्रवाहात उतरून शोध घेत सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास शाहआलम याचा मृतदेह बाहेर काढला. तर शाहबाजचा शोध घेतला जात असून अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे आज सकाळी पुन्हा अग्निशामक दलाच्या जवानांची स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.